T20 World Cup : “5 तारखेला मॅच आहे, आता बोलून काय करू…”, रोहित शर्मा त्या प्रश्नानंतर तापला

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. त्यामुळे कोणती प्लेइंग इलेव्हन घेऊन रोहित शर्मा मैदानात उतरणार याची उत्सुकता लागून आहे. कोणत्या चार खेळाडूंना रोहित शर्मा डगआऊटमध्ये बसवेल याची उत्सुकता लागून आहे. रोहित शर्माला कॉम्बिनेशनबाबतही काही प्रश्न विचारण्यात आले.

T20 World Cup : 5 तारखेला मॅच आहे, आता बोलून काय करू..., रोहित शर्मा त्या प्रश्नानंतर तापला
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 6:21 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या 29 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी 20 संघांची घोषणा झाली असून टीम इंडियाही सज्ज आहे. टीम इंडिया अ गटात असून यात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत. या गटातील टॉप 2 संघ पुढच्या फेरीत एन्ट्री घेतील. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध आहे. या स्पर्धेसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु आहे. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाल्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये प्लेइंग 11 ची उत्सुकता लागून आहे. काय कॉम्बिनेशन घेऊन रोहित शर्मा मैदानात उतरेल याबाबत खलबतं सुरु आहेत. असं असताना टीम इंडियाची घोषणा झाल्याच्या दोन दिवसांनी कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा नेहमीच्या शैलीत संतापलेला दिला. वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात जसप्रीत बुमराहसोबत कोण असेल? हा प्रश्न विचारताच रोहित शर्मा तापला.

कर्णधार रोहित शर्मा त्याच्या शैलीत म्हणाला की, “5 तारखेला मॅच आहे. आता सांगून काय करू. आता कॉम्बिनेशन जाणून काय करायचं आहे.” रोहित शर्माने पुढे फिरकीपटूंच्या निवडीमागचं लॉजिकही स्पष्ट केलं. “मला चार फिरकीपटू हवे होते. सामना सकाळी 10 ते 10.30 सुरु होणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन चार फिरकीपटू निवडले आहेत. याबाबत मी वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान सांगेन. तीन वेगवान गोलंदाज असून हार्दिक चौथा असेल. संघात समतोलपणा असायला हवा. फिरकीपटूंमध्ये जडेजा आणि अक्षर बॅटिंगही करू शकताता. आम्ही आमची प्लेइंग इलेव्हन विरोधी संघाची स्ट्रेंथ पाहून निवडू. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल एकत्र खेळण्याची शक्यता आहे. कोणतंही कॉम्बिनेशन शक्य आहे.”

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.. राखीव खेळाडू:  शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.