USA vs IRE: पावसामुळे सामना रद्द, पाकिस्तान ‘आऊट’, यूएसए Super 8 मध्ये
United States vs Ireland Match Called Off Due To Rain: यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं साखळी फेरीतच पॅकअप झालं आहे.
क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात यूनायटेड स्टेट्स विरुद्ध आयर्लंड ए ग्रुपमधील संघ आमनेसामने होते. मात्र पावसामुळे हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे. सामना रद्द झाल्याने आयर्लंड आणि यजमान यूनायटेड स्टेट्स या दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. यूएसएने यासह सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर पावसामुळे पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे.
यूएसए विरुद्ध आयर्लंड सामन्याला नियोजित वेळेनुसार 8 वाजता सुरुवात तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र सामन्याआधीच पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाने बॅटिंग करणं सुरुच ठेवलं होतं. त्यामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून ठराविक वेळेने पाहणी करणं सुरुच होतं. त्यानुसार रात्री 9 आणि 10 वाजता पाहणी करण्यात आली. त्यानंतर 10 वाजून 45 मिनिटांनी पाहणी केली. त्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान आयर्लंड आणि यूएसएला सामना रद्द झाल्याने दोघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळाला. यूएसएचे यासह एकूण 5 पॉइंट झाले. यूएसएने यासह सुपर 8 मध्ये धडक दिली. विशेष म्हणजे यूएसएने पहिल्याच झटक्यात सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलंय. श्रीलंका, न्यूझीलंड सारख्या संघांनाही ही कामगिरी जमली नाही. तर पावसामुळे सामना रद्द झाल्याने पाकिस्तान क्रिकेट टीमचाही बाजार उठला आहे.
यूनायडेट स्टेट्स सुपर 8 मध्ये, पाकिस्तान आऊट
The fate of Group A is 🔒
USA advance to the Super Eight of the #T20WorldCup 2024 as they share a point each with Ireland 👏#USAvIRE pic.twitter.com/NvlDPT0T0Y
— ICC (@ICC) June 14, 2024
आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.
युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.