USA Vs IRE: यूएसए-आयर्लंड 5-5 ओव्हरचा सामना होणार? आयसीसीकडून मोठी अपडेट
T20 World Cup 2024 USA vs Ireland: यूएसए विरुद्ध आयर्लंड या सामन्यात पावसाने विघ्न घातलं आहे. त्यामुळे अद्याप सामन्याला सुरुवात होणं सोडा टॉसही होऊ शकलेला नाही.
यूनायटेड स्टेट्स विरुद्ध आयर्लंड या ए ग्रुपमधील सामन्यावर पावसाच सावट आहे. सामना रद्द होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सामन्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कारण हा सामना रद्द जरी झाला तर यूएसए सुपर 8 मध्ये पोहचेल. तर पाकिस्तान क्रिकेट टीमचं पॅकअप होईल. सामना रद्द झाल्याने यूएसए आणि आयर्लंड दोन्ही संघांना 1-1 पॉइंट देण्यात येईल. यूएसएने याआधी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. यूएसए या 1 पॉइंट्ससह सुपर 8 मध्ये टीम इंडियानंतर पोहचणारी दुसरी टीम ठरेल. या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केली. तसेच या सामन्याबाबत आयसीसीने मोठी अपडेट दिली आहे. साखळी फेरीतील सामने पावसामुळे रद्द झाल्यास, त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. त्यामुळे सामना निकाली काढण्यासाठी यूएसए-आयर्लंड यांच्यात 5-5 ओव्हरचा सामना होणं, ही अखेरची शक्यता आहे. आयसीसीनुसार, 5-5 ओव्हरचा सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत शक्य आहे. म्हणजेच या 11 वाजून 46 मिनिटापर्यंत सामना झाला, तर तो 5 ओव्हरचा होईल. त्यामुळे सामन्याला या वेळेआधी सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असावी, आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
पुढील पाहणी पावणे अकरा वाजता
दरम्यान पंचांनी रात्री 10 वाजता मैदानाची पाहणी केली. पंचांनी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर पुढील पाहणी थोड्याच वेळात 10 वाजून 45 मिनिटांनी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता या पाहणीनंतर क्रिकेट चाहत्यांना दिलासादायक वृत्त अपेक्षित आहे.
आता 10.45 ला पंचनामा
THE NEXT INSPECTION AT 10.45 PM IST…!!!! pic.twitter.com/WvKazLbIQJ
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2024
आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.
युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.