USA vs PAK: यूएसएने पाकिस्तानला घाम फोडला, यजमांनांसमोर 160 धावांचं आव्हान

United States vs Pakistan 1st Innings Highlights In Marathi: शाहिन शाह अफ्रिदी याने अखेरच्या क्षणी केलेल्या 22 धावांच्या नाबाद खेळीमुळे पाकिस्तानला 150 पार मजल मारता आली.

USA vs PAK: यूएसएने पाकिस्तानला घाम फोडला, यजमांनांसमोर 160 धावांचं आव्हान
saurabh netravalkar usa cricket teamImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 11:05 PM

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात पाकिस्तानने यूएसएला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम याने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर शादाब खान याने 40 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी इफ्तिखार अहमद आणि शाहिन आफ्रिदी या दोघांनी छोटेखानी पण निर्णायक खेळी केली. यूएसएकडून नॉथुश केंजिगे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मु्ंबईकर सौरभ नेत्रवाळकर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

यूएसएने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएसच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला पावरप्लेमध्ये चांगलंच बांधून ठेवलं. यूएसएच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला पहिल्या 6 ओव्हरमध्ये 30 धावांच्या मोबदल्यात 3 धक्के दिले. त्यानंतर कॅप्टन बाबर आझम आणि शादाब खान या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 50 बॉलमध्ये 72 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर यूएसएने पुन्हा सामन्यात कमबॅक करत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या.

शादाब खान याने 25 बॉलमध्ये 1 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 40 धावांची निर्णायक खेळी केली. कॅप्टन बाबर आझम याने 43 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 102.33 च्या स्ट्राईक रेटने 44 धावांची खेळी केली. इफ्तिखार अहमद याने 18 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या आणि निर्णायक क्षणी शाहिन शाह अफ्रिदी याने 16 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नॉट आऊट 23 रन्स केल्या. तर हरीस रौफ 3 धावांवर नाबाद परतला.

पाकिस्तानच्या एकूण दोघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर एक आला तसाच गेला. विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान याने सिक्ससह पाकिस्तान आणि स्वत:चं खातं उघडलं. मात्र रिझवान 9 धावा करुन आऊट झाला.तर उस्मान खान याने 3 धावा केल्या. आझम खान याला भोपळाही फोडता आला नाही. आझम गोल्डन डक ठरला. तर फखर झमान याने 11 रन्स केल्या. तर यूएसएकडून अली खान आणि जसदीप सिंग या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

यूएसएच्या गोलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.