ind vs sa final : ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा विश्वासघात, फायनलआधी आफ्रिकेला मोठी मदत
Ind vs sa Final : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. वर्ल्ड कपवर नाव कोरण्यापासून टीम इंडियाला आता फक्त एक विजय मिळवायचा आहे. कायम मोठा अडसर ठरत असलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाने बाहेर केलं. पण फायनल सामन्याआधी आफ्रिकेला ऑस्ट्रेलियालाकडून मदत मिळत आहे. कशी आणि कोण करत आहे जाणून घ्या.
T-20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली आहे. साऊथ आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा सामना होणार आहे. तुम्हाला माहिती का टीम इंडिया 2014 साली फायनलमध्ये पोहोचली होती. तेव्हा सेमी फायनलमध्ये आफ्रिकेचा पराभव टीम इंडियाने केला होता. त्यामुळे आपण इंग्लंडला पराभूत आपण जरी बदला घेतला असला तरी आपल्यासोबतही ते बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आफ्रिका संघाने एकही वर्ल्ड कप आपल्या नावावर केलेला नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी आफ्रिकन संघ आव्हान देऊ शकतात. या सगळ्यात ऑस्ट्रेलियाकडून साऊथ आफ्रिका संघाला फायनलआधी मोठी मदत झालीये.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास सुपर-8 फेरीतच संपला होता. टीम इंडियाने कांगारूंना हरवल्यावर ते बाहेर झाले. त्या सामन्याआधी अफगाणिस्तान संघाने त्यांचा पराभव केलेला होता. अफगाणिस्तान संघाने त्यानंतर बांगलादेशला हरवत सेमी फायनल गाठली होती. मात्र साऊथ आफ्रकेने त्यांचा पराभव करत त्यांना बाहेर केलं. तर टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत तब्बल दहा वर्षांनी फायनल गाठली आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपली सर्व ताकद लावताना दिसतील. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कॅप्टन आणि वर्ल कप विनर खेळाडू रिकी पॉन्टिंग याने आफ्रिका संघाला मदत केली आहे.
अनेक संघ म्हणतात फायनलचा सामना इतर सामन्यांसारखा असतो आणि ते वाचण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं असं म्हणणं योग्य नाही कारण पण ही एक मोठी संधी असते. आफ्रिकेची संघ याआधी फायनलपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे फायनल सामन्याचा आनंद घ्या. जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यासाठी तुमची तयारीही तशा प्रकारची हवी. आफ्रिकेच्या संघात टीम इंडियाला भिडण्याची प्रतिभा असल्याचं रिकी पाँटिंगने म्हटलं आहे.
Ind vs Sa world Cup Final Live Streaming
दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपमचा टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधी फायनल सामना 29 जूनला होणार आहे. हा सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन या मैदानावर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.