टी20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात हे वाद गाजले, कोणते ते जाणून घ्या

भारत पाकिस्तान हे संघ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांसमोर उभे ठाकतात. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही. त्यामुळे या सामन्यांना युद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले हे दोन संघ आता 9 जूनला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.

टी20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात हे वाद गाजले, कोणते ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 4:30 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं नववं पर्व सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार 2 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध होणाह आहे. तर दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आतापासूनच उत्सुकता वाढली आहे. या सामन्याच्या तिकीटाचे दर गगनाला भिडले आहेत. हॉटेलसह इतर गोष्टी महाग झाल्या आहेत. यावरून या दोन्ही संघांमधील चाहत्यांचा सामन्याप्रतीचा वेडेपणा दिसून येतो. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही संघातील तीन मोठ्या वादांची चर्चा रंगली आहे.

2016 टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते. या स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना 19 मार्चला धर्मशाळा येते होणार होता. मात्र या सामन्यापूर्वीच वादाला तोंड फुचटले. या सामन्याला स्थानिकांनी विरोध केला. पठाणकोटवरील हल्ल्यामुळे स्थानिक चांगलेच आक्रमक झाले होते. या हल्ल्यात 7 जवान ठार झाले होते. त्यामुळे या सामन्याला होणारा विरोध पाहता बीसीसीआयने ठिकाण बदललं. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर आयोजित करण्यात आला.

2016 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान होणारा विरोध पाहून खेळाडूंच्या पायाखालची जमिन सरकरली होती. त्यामुळे होणारा विरोध शांत करण्यासाठी कर्णधार शाहीद आफ्रिदीला पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्याने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, पाकिस्तानी लोकांचे भारताला अधिक प्रेम मिळेल. आफ्रिदीच्या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ उडाली. तेथे आफ्रिदीविरुद्ध संतापाची लाट उसळली होती.

2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यातील विराट कोहलीची खेळी कोणीही विसरू शकत नाही. या सामन्यात 20व्या षटकात भारताला 3 चेंडूत 13 धावा हव्या होत्या. त्यावेळी फिरकीपटू मोहम्मद नवाजने फुलटॉस चेंडू टाकला. या चेंडूवर विराटने षटकार ठोकला. पण चेंडू कमरेवर असल्याने पंचांनी नो बॉल दिला. फ्री हीट चेंडू विराटला खेळता आला नाही आणि चेंडू स्टंपला लागून थर्ड मॅनच्या दिशेने गेला.

या चेंडूवर विराट आणि दिनेश कार्तिकने तीन धावा घेतल्या. यावरून पाकिस्तान संघाने पंचांशी वाद घातला. हा चेंडू डेड घोषित करण्याची विनंती केली. मात्र पंचांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. तसेच भारताच्या खात्यात 3 धावा जमा झाल्या. आता 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कोणता वाद होतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.