Ind vs Aus : टीम इंडियाच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग याचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 167 धावांपर्यंत मजल मारती आली. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामुळे भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं.

Ind vs Aus : टीम इंडियाच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग याचं 'ते' ट्विट होतंय व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 12:29 AM

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सेमी फायनल सामन्यात भारताचा अवघ्या 5 धावांनी पराभव झाला. या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरची विकेट. हरमनप्रीत मोक्याच्या क्षणी बाद झाली. ती आऊट झाली पूर्ण सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला. ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 167 धावांपर्यंत मजल मारती आली. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामुळे भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं.

एक मॅचविनर खेळाडू सेमी फायनल मॅचमध्ये रनआऊट होतो. याआधीही असा सर्वांना धक्का बसला आहे. भारताला बाहेर पडताना पाहून दु: ख होत आहे. एकवेळ सामना भारताच्या बाजूने होता पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने परत एकदा सिद्ध केलं की त्यांना हरवणं कठीण आहे, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. सेहवागने ट्विट करताना 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनलमधील रन आऊट होतानाचा फोटो शेअर केला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी दोन विकेट मोक्याच्या वेळी गेल्या, त्यातील एक म्हणजे जेमीमा रॉड्रिंग्स आणि दुसरी हरमनप्रीत कौर. भारताच्या 28 धावांवर तीन विकेट्स गेल्या होत्या, भारत मोठ्या दबावामध्ये होता त्यावेळी हरमनप्रीत आणि जेमीमाने संयमी आणि निर्णायक भागादारी केली. ज्यामुळे सामना भारताच्या पारड्यात  झुकला होता. मात्र जेमीमा कीपरच्या डोक्यावरून बॉल मारण्याच्या प्रयत्नात बाद झाली. त्यानंतर आलेल्या रिचा आणि हरमनप्रीतने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली होतीत.

दरम्यान, दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीत बाद झाली, सर्व सामना इथेच फिरला. भारताचा अखेर 5 धावांनी पराभव झाला. भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं ते आणखी लांबलं आहे.

Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.

Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.