वुमन्स टी20 वर्ल्डकपसाठी आयसीसीची मोठी घोषणा, आता सर्व जबाबदारी महिलांच्या खांद्यावर

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. जेतेपदासाठी दहा संघ सज्ज झाले असून 3 ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. असं असातना आयसीसीने वुमन्स टी20 वर्ल्डकपसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकपसाठी आयसीसीची मोठी घोषणा, आता सर्व जबाबदारी महिलांच्या खांद्यावर
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 4:07 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह दहा संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. तसेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने एक एकदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला संघ यंदा जेतेपद मिळवेल का? असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला आहे. असं असताना आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. पहिल्यांदाच संपूर्ण स्पर्धेत महिलाराज पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत सामनाधिकारी असो की पंच, या सर्व भूमिका महिलाच बजावणार आहेत. आयसीसीने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी 10 पंच, तीन सामनाधिकाऱ्यांसह एकूण 13 जणांची अधिकृत घोषणा केली आहे. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल आणि अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे. एकूण 23 सामने या स्पर्धेत होणार आहेत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला देशातील स्थिती पाहता या स्पर्धेचं आयोज यूएईत करावं लागत आहे.

आयसीसीच्या पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापक सीन ईजीने सांगितलं की, ‘आमच्या खेळातील महिलांच्या प्रगतीसाठी योगदान दिल्याबद्दल आयसीसीला अभिमान आहे. आयसीसी महिला टी20 वर्ल्डकपसाठी महिलांना पंच आणि सामनाधिकारी म्हणून घोषित केल्याचा आनंद आहे. ही खरीच एक अद्भूत घटना आहे.’या स्पर्धेसाठी पंच म्हणून अनुभवी व्यक्तींना समितीत स्थान मिळालं आहे. या पंचांना टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पंचगिरी करण्याचा अनुभव आहे.

क्लेयर पोलोसाक पाचव्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पंचगिरी करताना दिसणार आहे. तर किम कॉटन आणि जॅकलीन विल्यमसन चौथ्यांदा पंचाची भूमिका बजावतील. मागच्या पर्वात अंतिम फेरीत सू रेडफर्न टीव्ही पंच होती. टी20 वर्ल्डकपमध्ये चौथ्यांदा ही भूमिका बजावणार आहे. झिम्बाब्वेची सारा दंबनेवाला पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेईल. तर जीएस लक्ष्मीला 12 वर्षांचा अनुभव आहे.

सामनाधिकारी : शँड्रे फ्रिट्ज, जीएस लक्ष्मी, मिचेल परेरा. सामना पंच : लॉरेन एजेनबॅग, किम कॉटन, सारा दंबनेवाला, अन्ना हॅरिस, निमाली परेरा, क्लेयर पोलोसाक, वृंदा राठी, सू रेडफर्न, एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विल्यम्स.

देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट.
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?.
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?.
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं...
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं....