IND vs BAN: भारत बांगलादेश सराव सामना किती वाजता सुरु होणार? विनामूल्य पाहण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेची उत्सुक प्रत्येक मिनिटाला वाढताना दिसत आहे. या स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताची लिटमस टेस्ट होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 1 जूनला सराव सामना होणार आहे. चला जाणून कुठे आणि कधी सामना पाहाता येणार ते..

IND vs BAN: भारत बांगलादेश सराव सामना किती वाजता सुरु होणार? विनामूल्य पाहण्यासाठी काय कराल? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 8:09 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 1 जून रोजी न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. याच मैदानावर भारतीय संघ साखळी फेरीतील तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ 26 मे रोजी अमेरिकेत दाखल झाला. त्यानंतर सराव शिबिरात भारतीय खेळाडूंना चांगलाच घाम गाळला. दुसरीकडे, बांगलादेशला अमेरिकेतील वातावरणाचा चांगलाच अंदाज आहे. बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका अमेरिकेने 2-0 ने जिंकली. आता बांगलादेश सराव सामन्यात विजय मिळवून पराभवाची जखम भरून काढण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होणार याचा अंदाज क्रीडाप्रेमींनी आधीच घेतला आहे. आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 12 वेळा भारताने विजय मिळवला आहे.

टी20 वर्ल्डकप भारत बांगलादेश सराव सामना कधी?

भारत बांगलादेश यांच्यातील सराव सामना भारतीय तारखेनुसार 1 जूनला होणार आहे.

भारत आणि बांगलादेश सराव सामना किती वाजता सुरू होईल?

सराव सामना अमेरिकेत होत असल्याने दोन्ही देशांमधील वेळेत बराच फरक आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

भारत आणि बांगलादेश सराव सामना कोठे होत आहे?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा सराव सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याचे थेट प्रवाह Disney+Hotstar वर उपलब्ध असेल. तसेच हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलच्या माध्यमातून टीव्हीवर पाहता येणार आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव: शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तन्झिद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदय, महमूद उल्लाह रियाद, जाकेर अली अनिक, तन्वीर इस्लाम, महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकीब.

राखीव : अफिफ हुसैन, हसन महमूद.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.