T20 World Cup Women : ‘खरं तर…’, पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवाचं कर्णधाराने यांच्यावर फोडलं खापर!

वुमन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंज महिला संघाने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं आहे. इंग्लंडनं 20 षटकात 5 गडी गमवून 213 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडच्या फलंदांजानी पाकिस्तानच्या गोलंदाजीतील पिसे काढलीत.

T20 World Cup Women : 'खरं तर...', पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवाचं कर्णधाराने यांच्यावर फोडलं खापर!
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 10:20 PM

England vs Pakistan : वुमन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड महिला संघाने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं आहे. इंग्लंडनं 20 षटकात 5 गडी गमवून 213 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीतील पिसे काढलीत. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 20 षटकात 9 विकेट्स गमावत 99 धावा केल्या. 115 धावांनी पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाची कर्णधार निदा दारने परभवाचं खापर संघाच्या फलंदाजांवर फोडलं आहे.

हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता, खरंच निराशाजनक आहे. आमची फलंदाजीत कमकुवत आहे. अशा सामन्यांमधून आम्हाला धडा घ्यावा लागेल आणि त्यातून काही सकारात्मक गोष्टीही घ्याव्या लागतील. आम्ही येथे दोन चांगले सामने खेळलो त्यामुळे काहीतरी शिकायला मिळेल. T20I मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होणं माझ्यासाठी मैलाचा दगड आहे.मला माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, हेच माझे ध्येय असल्याचं निरा दार म्हणाली.

विजेत्या इंग्लंड संघाची कर्णधार हिथर नाईट काय म्हणाली

उपांत्य फेरीच्या दृष्टीने आजचा प्रयत्न खरंच चांगला होता. आज आमचे फलंदाज ज्या प्रकारे खेळले, ते खरोखर चांगले होते. डॅनीने खूपच चांगली खेळी केली. तिच्या आक्रमक फलंदाजीमुळे मला खूप आनंद झाला. मला असे वाटते, उपांत्य फेरीसाठी हाच संघ घेऊन आम्ही उतरू. पण असं असलं तरी बरेच पर्याय आहेत.

उपांत्य फेरीत अ गटातून ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. तर न्यूझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्या संघासाठी चुरस आहे. तर ब गटातून इंग्लंड आणि भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्या फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा असेल. दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड किंवा दक्षिण आफ्रिका असा होईल.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....