England vs Pakistan : वुमन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड महिला संघाने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं आहे. इंग्लंडनं 20 षटकात 5 गडी गमवून 213 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीतील पिसे काढलीत. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 20 षटकात 9 विकेट्स गमावत 99 धावा केल्या. 115 धावांनी पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाची कर्णधार निदा दारने परभवाचं खापर संघाच्या फलंदाजांवर फोडलं आहे.
हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता, खरंच निराशाजनक आहे. आमची फलंदाजीत कमकुवत आहे. अशा सामन्यांमधून आम्हाला धडा घ्यावा लागेल आणि त्यातून काही सकारात्मक गोष्टीही घ्याव्या लागतील. आम्ही येथे दोन चांगले सामने खेळलो त्यामुळे काहीतरी शिकायला मिळेल. T20I मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होणं माझ्यासाठी मैलाचा दगड आहे.मला माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, हेच माझे ध्येय असल्याचं निरा दार म्हणाली.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने आजचा प्रयत्न खरंच चांगला होता. आज आमचे फलंदाज ज्या प्रकारे खेळले, ते खरोखर चांगले होते. डॅनीने खूपच चांगली खेळी केली. तिच्या आक्रमक फलंदाजीमुळे मला खूप आनंद झाला. मला असे वाटते, उपांत्य फेरीसाठी हाच संघ घेऊन आम्ही उतरू. पण असं असलं तरी बरेच पर्याय आहेत.
उपांत्य फेरीत अ गटातून ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. तर न्यूझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्या संघासाठी चुरस आहे. तर ब गटातून इंग्लंड आणि भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्या फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा असेल. दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड किंवा दक्षिण आफ्रिका असा होईल.