T20 World cup : वर्ल्ड कप नाही हे महायुद्ध…, महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढवला टीम इंडियाचा उत्साह
Amitabh Bachchan Gave Special Message Team India : आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी टीम इंडियाला खास मेसेज दिला आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं या स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्ल्ड कपसाठी नव्या जर्सीचंही अनावरण करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपसाठी जवळपास सर्व तयारी झाली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामादरम्यान टीम इंडियाचे काही खेळाडू हे वर्ल्ड कपसाठी उड्डाण घेणार आहेत. अशात ‘बिग बी’, बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी खास मेसेज देत त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. हा वर्ल्ड कप नाही, तर महायुद्ध आहे,असं बच्चन यांनी दिलेल्या मेसेजमध्ये म्हटलंय.
स्टार स्पोर्ट्सवर टी 20 वर्ल्ड कपचे सामने पाहता येणार आहेत. स्टार स्पोर्ट्सने 40 सेकंदांचा अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियाला संदेश देणारा व्हीडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हीडिओत टीम इंडियाच्या खेळाडूंची तुलना ही योद्धांसोबत करत त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या व्हीडिओत टी 20 वर्ल्ड कप 2022 आणि वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील टीम इंडियाच्या निवडक खेळाडूंच्या क्लिप्सही आहेत. अमिताभ बच्चन यांनी टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासह आपल्या सिनेमाचा प्रचारही केला आहे.
“युद्ध दररोज होतं, पण महायुद्ध सर्वात मोठी परीक्षा घेतं. येथे क्षणोक्षणी पारा चढतो. धमण्यांतून रक्त उसळतं. आग ज्याला गळाभेट घेते तोच वीर ताठ मानेने चालतो”, असं बच्चन यांनी या व्हीडिओत म्हटलंय. बच्चन यांचा हा व्हीडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.
बिग बी यांचा टीम इंडियाला खास मेसेज
🔥 40 Seconds of GOOSEBUMPS 🔥
Watch @SrBachchan, Team India’s biggest cheerleader, unleash his passionate message for @ImRo45 & Co., who brace for the ultimate challenge! 💪
Send in a ‘💙’ to echo the superstar’s roar for #TeamIndia in the T20 World Cup!
Don’t miss the epic… pic.twitter.com/X9cICNdYge
— Star Sports (@StarSportsIndia) May 8, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान