IPL 2025 : भारताला विश्व विजेता करणारा दिग्गज मुनाफ पटेल दिल्ली कॅपिट्ल्सचा बॉलिंग कोच

IPL 2025 Delhi Capitals Bowling Coach Munaf Patel : आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी दिल्ली कॅपिट्ल्सने टीम इंडियाचा गोलंदाज आणि 2011 च्या एकदिवसीय विश्व विजेत्या संघाचा खेळाडू मुनाफ पटेल याची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे.

IPL 2025 : भारताला विश्व विजेता करणारा दिग्गज मुनाफ पटेल दिल्ली कॅपिट्ल्सचा बॉलिंग कोच
Sachin tendulkar and munaf patelImage Credit source: munaf patel x account
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 9:10 PM

आयपीएल 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या मेगा ऑक्शकडे रिलीज करण्यात आलेल्या खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. हा मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे होणार आहे. त्याआधी कोणता खेळाडू महागडा ठरणार? कुणाला किती रक्कम मिळणार? अशी चर्चा आता सोशल मीडियावर पाहायला मिळत असताना दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने त्यांच्या नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. 2011 च्या विश्व विजेत्या संघाचा खेळाडू आणि गोलंदाज मुनाफ पटेल याची दिल्ली कॅपिट्ल्स टीमचा बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने एक्स या सोशल मीडिया प्लटफॉर्मवरुन ही माहिती दिली आहे.

तिसरा मोठा बदल

दिल्ली कॅपिट्ल्सकडून कोचिंग स्टाफमध्ये करण्यात आलेला हा तिसरा बदल आहे. याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हेमंग बदानी यांची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. बदानी यांची दिल्ली कॅपिट्ल्समध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्या जागी नियुक्ती करण्यात आली. तर टीम इंडियाचा माजी फलंदाज वेणुगोपाल राव दिल्ली कॅपिट्ल्सचा क्रिकेट डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

मुनाफ पटेल याची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द

मुनाफ पटेल याला गोलंदाजीचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. मुनाफ पटेलने आयपीएलमधील 63 सामन्यांमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाने 2011 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता. मुनाफ पटेल त्या विश्व विजयी संघाचा सदस्य होता.तसेच मुनाफ पटेल याने टीम इंडियाचं 13 कसोटी, 70 एकदिवसीय आणि 3 टी 20iसामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मुनाफ पटेलने कसोटीमध्ये 35, वनडेत 86 आणि टी 20i मध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

मुनाफ पटेल देणार बॉलिंगचे धडे

आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेले खेळाडू : ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अभिषेक पोरेल.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.