टीम इंडियात 3 तरबेज गोलंदाज, दक्षिण आफ्रिकेलाही धडकी
टीम इंडियातील तीन तरबेज गोलंदाजांमुळे टीम इंडियाला धडकी भरली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INS vs SA) आज टी 20 (T20) सीरीजमधला शेवटचा सामना सुरु आहे. त्यामुळे अवघ्या क्रिकेटविश्वाचं (Cricket) लक्ष याकडे लागून आहे. इंदूरमध्ये ही मॅच सुरु आहे. टीम इंडियानं तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीमध्ये झालेला सामना जिंकलाय. टीम इंडियानं सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडीही घेतलीय. आज टीम इंडिया क्लीन स्वीपच्या इराद्यानं मैदानात उतरली आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या तीन गोलंदाजामुळे दक्षिण आफ्रिकेला धक्का बसला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमचं टेन्शन देखील वाढलं आहे.
बीसीसीआयचं ट्विट
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bowl first in the final T20I.
Three changes for #TeamIndia in the Playing XI
Live – https://t.co/dpI1gl5uwA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/gq4Ybx4n6V
— BCCI (@BCCI) October 4, 2022
तिघांची भीती
भारतात येण्याआधी चांगल्या फॉर्ममध्ये असलेला बावुमा इथे आपल्या तालमीपासून दूर गेला. वेगवान गोलंदाजांनी बावुमाला तीनही वेळा आपला बळी बनवले.
पहिल्या सामन्यात दीपक चहर, दुसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि तिसऱ्या सामन्यात उमेशने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे आता या तिन्ही गोलंदाजी भीती दक्षिण आफ्रिकेला लागून आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला भारतात खूप त्रास सहन करावा लागला आहे. तिसऱ्या सामन्यात बावुमा पुन्हा वाईटरित्या फ्लॉप झाला. उमेश यादवनं 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बावुमाला आपला बळी बनवले.
तिसऱ्या सामन्यात बावुमाला केवळ 3 धावा करता आल्या. या सामन्यात त्यानं तिसऱ्या चेंडूवर एकेरी घेत मालिकेतील आपली पहिली धाव काढली. पण त्याला आपला डाव फारसा पुढे वाढवता आला नाही. यापूर्वी बावुमाला पहिल्या दोन सामन्यात खातेही उघडता आले नव्हते. म्हणजेच भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला केवळ 3 धावा करता आल्या.
टीम इंडियाचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेचा खेळ-11
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.