IND vs SL | टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्ध विजयी हॅटट्रिक

India vs Sri Lanka | टीम इंडियाने 12 वर्षानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंका टीमला पराभूत केलंय. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूंना या विजयात मोलाची भूमिका बजावली.

IND vs SL | टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्ध विजयी हॅटट्रिक
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 12:37 AM

मुंबई | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची सुस्साट घोडदौड सुरुच आहे. टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या सातव्या सामन्यातही विजय मिळवलाय. टीम इंडियाने 302 धावांनी श्रीलंकेचं लंकादहन केलंय. टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकाने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या धारदार बॉलिंगसमोर शरणागती पत्कारली. टीम इंडियाने श्रीलंकाचा बाजार हा 19.4 ओव्हरमध्ये 55 धावांवर आटोपला. टीम इंडियाने यासह वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्ध विजयी हॅटट्रिक पूर्ण केली.

टीम इंडियाचा श्रीलंका विरुद्ध विजयी हॅटट्रिक

टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासातील हा सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी 2011 मध्ये श्रीलंकाचा याच वानखेडे स्टेडियममध्ये पराभव केला. टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवलं होतं. त्यानंतर 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांचा आमनासामान झाला नाही. मात्र 8 वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये टीम इंडिया-श्रीलंका आमनेसामने आले. तेव्हा टीम इंडियाने श्रीलंकेला पुन्हा पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकावर विजय मिळवला.

सेमी फायनलमध्ये धडक आणि अव्वल स्थानी झेप

टीम इंडिया या विजयासह सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग चौथी वेळ ठरली आहे. टीम इंडियाने 2011 पासून ते आतापर्यंत ही परंपरा कायम ठेवली आहे. तसेच टीम इंडियाने श्रीलंकावर मात करत पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकाला मागे टाकलंय. टीम इंडिया यासह अव्वल स्थानी पोहचली आहे. दरम्यान टीम इंडियाचा पुढील सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश तीक्षना, कसुन रजिथा, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मदुशंका.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.