IND vs ENG | आर अश्विनची घोडचूक, बॅटिंगआधीच इंग्लंडचं खातं उघडलं, नक्की काय झालं?

India vs England 3rd Test | आर अश्विन याने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून बॅटिंग करत त्यांना फुकटात 5 धावा करुन दिल्या आहेत. जाणून घ्या नक्की काय झालं?

IND vs ENG | आर अश्विनची घोडचूक, बॅटिंगआधीच इंग्लंडचं खातं उघडलं, नक्की काय झालं?
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 11:58 AM

राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी अनुभवी आर अश्विन याच्याकडून मोठी घोडचूक झाली आहे. आर अश्विन याच्या एकट्याच्या चुकीमुळे टीम इंडियाला फटका बसला आहे. अश्विनच्या एका चुकीमुळे इंग्लंडला मोठा फायदा झाला आहे. अश्विनमुळे टीम इंडियाच्या डावातच इंग्लंडचं खातं उघडलं आहे. आता इंग्लंडच्या बॅटिंगची सुरुवात ही 0 पासून न होता 5 धावांपासून होणार आहे. अश्विनकडून नक्की काय झालं? त्याआधी रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी काय गोंधळ घातला? हे सविस्तर जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

आर अश्विन टीम इंडियाच्या डावातील 102 व्या ओव्हरमध्ये ही चूक केली. ज्यामुळे टीम इंडियाला 5 धावांचा तोटा सहन करावा लागला. इंग्लंडकडून रेहान अहमद हा 102 वी ओव्हर टाकायला आला. रेहानच्या या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अश्विनने सिंगल घेण्यासाठी धावला. या दरम्यान अश्विनने चूक केली. अश्विन पीचच्या मधल्या भागातून (स्टंप्सच्या रांगेतून) धावायला लागला.

हे सुद्धा वाचा

नियमांनुसार, स्टंपच्या रांगेतून धावता येत नाही. त्यामुळे खेळपट्टीचं नुकसान होतं. पहिल्या दिवशी रवींद्र जडेजानेही अशीच चूक केली होती. मात्र अंपायरने जडेजाला याबाबत ताकीद दिली होती. त्यानंतर अश्विनकडून पुन्हा अशीच चूक झाल्याने अंपायरने 5 धावांची पेन्लटी लावली. त्यामुळे अंपायर जोएल विल्सन याने टीम इंडियाला 5 धावांचा दंड ठोठावला. त्यामुळे आता इंग्लंडच्या बॅटिंगची सुरुवात ही 5 धावांपासून होईल.

दरम्यान टीम इंडियाची दुसऱ्या दिवशी निराशाजनक सुरुवात झाली. कुलदीप यादव याच्यानंतर शतकवीर रवींद्र जडेजा दोघे झटपट आऊट झाले. मात्र त्यानंतर आर अश्विन आणि ध्रुव जुरेल या दोघांनी लंच ब्रेकपर्यंत नाबाद 57 धावांची भागीदारी केली आहे. तर टीम इंडियाच्या 113 ओव्हरमध्ये 7 बाद 388 धावा झाल्या आहेत.

इंग्लंडला 5 रन बोनस

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.