टीम इंडियाने टी20 क्रिकेट विजयात गाठलं पहिलं स्थान, पाकिस्तानला टाकलं मागे
झिम्बाब्वेला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 4-1 ने नमवलं. चार विजयासह टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे. शेवटचा सामना जिंकताच टीम इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पाकिस्तानलाही विजयाच्या विक्रमात मागे टाकलं आहे.
-
-
टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मालिकेतील पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत करताच हा मान टीम इंडियाला मिळाला आहे.
-
-
टीम इंडिया टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला आहे. यापूर्वी या स्थानावर पाकिस्तानचा संघ होता. भारताने प्रतिस्पर्धी संघांच्या मायभूमीवर 51 सामने जिंकले आहे.
-
-
पाचव्या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान 50 सामने जिंकून बरोबरीवर होते. पण पाचवा सामना जिंकताच टीम इंडिया पुढे निघून गेली आहे. या यादीत 39 विजयासह ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
-
-
भारताने 82 सामने खेळले असून 51 सामन्यात विजय, 27 सामन्यात पराभव, 3 सामने बरोबरीत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. पाकिस्तान 95 सामने खेळले असून यात 50 सामन्यात विजय, 39 सामन्यात पराभव, 1 बरोबरीत आणि 5 सामन्यांचा निकाल लागला नाही.
-
-
टीम इंडिया 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून गौतम गंभीर प्रशिक्षक असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.