Retirement: अश्विननंतर आता टीम इंडियाचे चौघे निवृत्त होणार? विराटसह या तिघांची नावं
Team India Player Retirement 2025: आर अश्विन याने 18 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता टीम इंडियातील 4 खेळाडूंची नावं निवृत्तीसाठी आघाडीवर आहेत.
टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याने 18 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अश्विन या 2024 वर्षात निवृ्त्ती घेणारा टीम इंडियाचा 11 वा खेळाडू ठरला. आता येत्या काही महिन्यांमध्ये टीम इंडियाचे आणखी 4 खेळाडू निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. या चौघांमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांचं नाव आघाडीवर आहे. हे दोघेही गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहेत. त्यामुळे हे दोघे 2025 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. तसेच या दोघांसह ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि विराट कोहली या दोघांचंही नाव चर्चेत आहे.
चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजारा टीम इंडियापासून गेली दीड वर्ष दूर आहे. पुजाराने अखेरचा कसोटी सामना हा जून 2023 मध्ये खेळला होता. तेव्हापासून पुजारा कमबॅक करण्यात अपयशी ठरला आहे. पुजारा निवृत्ती कधी घेणार? याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र पुजाराचं 2025 हे अखेरचं वर्ष असू शकतं. पुजाराने कसोटी कारकीर्दीतील 103 कसोटी सामन्यांमध्ये 19 शतकं आणि 3 द्विशतकांसह 7 हजार 195 धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे याने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिलाय. रहाणे टेस्ट प्लेअर आहे, असं म्हटलं जातात. मात्र रहाणेने गेल्या आयपीएल स्पर्धेत आणि नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी धमाकेदार खेळी केली. मात्र रहाणेचा निवड समितीकडून भारतीय संघात स्थान देण्याबाबत सध्या तरी विचार दिसत नाहीय. रहाणेने जुलै 2023 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रहाणेने 85 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकं आणि 26 अर्धशतकांसह 5 हजार 77 धावा केल्या.
रवींद्र जडेजा
अश्विन आणि रवींद्र जडेजा ही टीम इंडियाची फिरकी जोडी होती. मात्र आता अश्विनच्या निवृत्तीमुळे रवींद्र जडेजा एकटा पडला आहे. जडेजालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. जडेजाने टी 20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. जडेजा आता वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळतोय. जडेजा याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे काही वर्षं बाकी आहेत.
विराट कोहली
अश्विनच्या निवृत्तीनंतर विराट कोहली ही लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ही चर्चाच आहे. याला कोणताही आधार नाही. विराटने टी 20I क्रिकेटला रामराम केला आहे.