Team India | निवड समितीकडून दुर्लक्ष, 1 वर्षापासून टीम इंडियातून बाहेर, ऑलराउंडरचा मोठा निर्णय
Indian Cricket Team | टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर खेळाडूला गेल्या 1 वर्षापासून संधी मिळालेली नाही. त्यामुळे हा ऑलराउंडर आता दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.
मुंबई | क्रिकेट टीम इंडियाच्या खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर अनेक दिवसांची विश्रांती मिळाली. आयपीएलनंतर थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्यासाठी भारतीय खेळाडू लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेता आली नाही. मात्र इंग्लंडहून परतल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना स्वत:सह कुटुंबियांना वेळ देता आला. या विश्रांतीनंतर टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. कसोटी, वनडे आणि टी 20 असा टीम इंडियाचा विंडिज दौरा असणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
बीसीसीआयने 2 सामन्यांच्या कसोटी आणि 3 मॅचच्या वनडे सीरिजसाठी 23 जून रोजी भारतीय संघ जाहीर केला. या दोन्ही माालिकांसाठी निवड समितीने युवा खेळाडूंना संधी दिली. तसेच अनुभवी खेळाडूंना विश्रांती आणि बाहेरचा रस्ताही दाखवला. अशात एका ऑलराउंडर खेळाडूची विंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. हनुमा विहारी याला वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. हनुमाने आपला अखेरचा कसोटी सामना हा 1 जुलै 2022 रोजी इंग्लंड विरुद्ध खेळला होता. मात्र त्यानंतर निवड समितीने विहारीवर विश्वासच दाखवला नाही.
त्यामुळे हनुमा विहारी याने मोठा निर्णय घेतलाय. विहारीने टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. हनुमा आता रणजी ट्रॉफीत नव्या टीमसाठी खेळताना दिसणार आहे. हनुमा सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत साऊथ झोन संघांचं नेतृत्व करतोय.
हनुमा आतापर्यंत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेश टीमकडून खेळत होता. मात्र हनुमा आता मध्यप्रदेश टीमकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र हनुमाला टीम बदलण्यासाठी आंध्रप्रदेश क्रिकेट बोर्डाकडून एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. हनुमाचं नव्या टीमच्या मदतीने भारतीय क्रिकेट संघात कमबॅक करण्याचे प्रयत्न आहेत. तसेच रिपोर्ट्नुससार, हनुमाला प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनात खेळायचंय. यासाठी हनुमाने टीम बदलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान हनुमाची टीम बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही. हनुमाने हैदराबादकडून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर हनुमाने 2015-16 साली आंध्रप्रदेशचं प्रतिनिधित्व केलं. हनुमा त्यानंतर 2021-11 मध्ये पुन्हा हैदराबादकडे वळला. त्यानंतर परत मागील मोसमात हनुमा आंध्रप्रदेश टीममध्ये गेला. हनुमाने काही दिवसांआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेशचं नेतृत्वही केलं.
हनुमा विहारी याची कारकीर्द
हनुमाने आतापर्यंत 113 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. हनुमाने या 113 सामन्यांमध्ये 54.41 च्या सरासरीने 8 हजार 600 धावा केल्या आहेत. हनुमाने या दरम्यान 23 शतकं आणि 45 अर्धशतकं केली आहेत. तसेच हनुमाने टीम इंडियासाठी 16 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. हनुमाने या 16 कसोटी सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांच्या मदतीने 839 धावा केल्या आहेत.