टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे. या दरम्यान आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बापमाणूस झाला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल उर्फ बापू हा बाबा झाला आहे. अक्षर आणि त्याची पत्नी मेहा पटेल यांना मुलगा झाला आहे. क्रिकेटरने सोशल मीडियावरुन ही गोड बातमी क्रिकेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच अक्षर आणि मेहा या दोघांनी यासह मुलाचं नावही जाहीर केलं आहे.
अक्षर पटेल याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. अक्षरने मुलाचा चेहरा लपवत टीम इंडियाच्या जर्सीसह त्याला मुलगा झाल्याची ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.”तो आताही पायाने ऑफ साईडला जातोय. मात्र आम्ही त्याला निळ्या रंगात (जर्सीत) तुमच्यासोबत ओळख करुन देण्याची प्रतिक्षा करु शकत नाहीत. आमच्या काळजाचा सर्वात खास तुकडा हक्श पटेल यांचं स्वागत आहे. भारताचा सर्वात लहान, तरीही सर्वात मोठा चाहता”, असं अक्षरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय आणि मुलाचं नावही जाहीर केलंय.
अक्षर आणि मेहा या दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. त्यानंतर अक्षरने 2022 साली मेहाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केलं. त्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर 26 जानेवारी 2023 रोजी दोघेही विवाहबद्ध झाले. त्यानंतर आता या दोघांना पुत्ररत्न प्राप्रत झालं आहे. मेहा ही डायटेशियन आणि न्यूट्रीशनिस्ट आहे.
अक्षर पटेलची पोस्ट
He’s still figuring out the off side from the leg, but we couldnt wait to introduce him to all of you in blue. World, welcome Haksh Patel, India’s smallest, yet biggest fan, and the most special piece of our hearts.
19-12-2024 🩵🧿 pic.twitter.com/LZFGnyIWqM— Axar Patel (@akshar2026) December 24, 2024
दरम्यान 30 वर्षीय अक्षर पटेल याने आतापर्यंत टीम इंडियाचं 14 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 66 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अक्षरने कसोटीत 55, वनडेत 64 आणि टी 20i मध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत. तर अक्षरने कसोटीत 646, वनडेत 568 आणि टी 20iमध्ये 498 धावा केल्या आहेत. तसेच अक्षरने आयपीएलमधील 150 सामन्यांमध्ये विविध संघांचं प्रतिनिधित्व करताना 123 विकेट्स घेण्यासह 1 हजार 653 धावा केल्या आहेत.