Amit Mishra चा शुबमनवर कॅप्टन्सीवरुन हल्लाबोल, म्हणाला तो कर्णधार म्हणून लायक…” व्हीडिओ व्हायरल
Amit Mishra on Shubhman Gill Captaincy: शुबमन गिल याने झिंबाब्वे दौऱ्यात टीम इंडियाला 5 सामन्यांच्या टी20i मालिकेत आपल्या नेतृत्वात 4-1 ने विजय मिळवून दिला.
शुबमन गिल याने झिंबाब्वे दौऱ्यात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजय मिळवून दिला. शुबमन गिल याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 4-1 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकून दिली. टीम इंडियाला यजमान झिंबाब्वेकडून पहिल्या टी 20 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे शुबमनला कॅप्टन म्हणून काहीशी टीका सहन करावी लागली. मात्र त्यानंतर शुबमन आणि युवा ब्रिगेडने सलग 4 सामने जिंकत ताकद दाखवून दिली. शुबमनच्या कर्णधाल म्हणून या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा शुबमन गिल याच्या नेतृत्वाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अमिता मिश्रा काय म्हणाला?
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर मुख्य आणि अनुभवी खेळाडूंना विश्रांत देण्यात आली. तर युवा ब्रिगेडला झिंबाब्वे दौऱ्यासाठी संधी दिली गेली. टी 20 मालिकेत कॅप्टन्सीची संधी शुबमन गिल याला देण्यात आली. एका युट्युबरने घेतलेल्या मुलाखतीत अमित मिश्राला शुबमनला कॅप्टन्सी देण्यावरुन प्रश्न केला. यावरुन अमित मिश्रा म्हणाला की,”मला नाही वाटत की त्याला कॅप्टन करायला हवा. मी असतो तर त्याला कॅप्टन्सी दिली नसती. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिलं आहे. कॅप्टन्सी कशी करायची हे त्याला माहितच नाही. त्याच्याकडे कोणतीही आयडिया नाही.”
शुबमन गिल याने 2019-2020 च्या दिलीप ट्रॉफी स्पर्धेत आपल्या संघाच नेतृत्व केलं होतं. शुबमन गिल याच्या काही सामन्यांचा अपवाद वगळता त्याला नेृतत्वाचा फारसा अनुभव नाही. आयपीएलच्या 17 व्या मोसमात (IPL 2024) मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सच्या हार्दिकला आपल्या ताफ्यात घेत कॅप्टन केलं. त्यामुळे गुजरातच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमनला मिळाली. मात्र शुबमनच्या नेतृत्वात गुजरात टीम आठव्या स्थानी राहिली. यावरूनही अमित मिश्राने शुबमनवर निशाणा साधला. “टीम इंडियात कुणाला कॅप्टन करा, असं व्हायला नको”, असं अमितने म्हटलं.
अमित मिश्राचा शुबमनच्या नेतृत्वावर निशाणा
Amit Mishra says LSG will look for a better captain than KL Rahul and as per him Shubman gill should not be India’s captain as he seemed clueless after watching him from close quarters in IPL. pic.twitter.com/rNNXO3hSoe
— 𝗔𝗱𝗶𝘁𝘆𝗔 (@StarkAditya_) July 15, 2024
“शुबमनकडे नाईलाजाने कर्णधारपदाची सूत्र”
अमित मिश्रा इतक्यावरच थांबला नाही. त्याने शुबमनला आयपीएलमध्ये कदाचित नाईलाजाने कॅप्टन केलं असल्याचा खुलासाही केला. हार्दिक अखेरच्या क्षणी मुंबईत गेल्याने शुबमनला गुजरातचं कॅप्टन करण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमितने म्हटलं.