ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या ( Icc World Test Championship 2021 Final) अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजासह संघासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शतक. एका शतकामुळे सामना पलटला जातो आणि जर एखाद्या खेळाडूच्या शतकामुळे सामना जिंकलातर त्या खेळाडूवर कौतुकाचा वर्षावच होतो. असेच काही फलंदाज आहेत ज्यांच कसोटी सामन्यात शतक म्हणजे भारतीय संघाचा विजय पक्का असं समीकरणच होतं.यात विराट कोहली, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड किंवा महेंद्र सिंह धोनी यांच नाव नसून इतर दिग्गजांची नावे आहेत. (This Indian Cricketers Century brings win For Indian Cricket Team)
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 6:41 PM

मुंबई : जून महिन्यात टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना (ICC World Test Championship Final) खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. या अंतिम सामन्यासाठी या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना 18 ते 23 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. (Team India announces squad for ICC World Test Championship 2021 final and test series against England)

मुंबईकर पृथ्वीला डच्चू

निवड समितीने पुन्हा एकदा युवा पृथ्वी शॉवर अविश्वास दाखवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वीला संधी मिळाली नाही. पृथ्वीने विजय हजारे करंडकात आणि आयपीएलच्या 14 व्या मोसमात शानदार कामगिरी केली. पृथ्वीने आपल्या नेतृत्वात विजय हजारे स्पर्धेत संघाला जेतेपद जिंकून दिलं होतं. तर आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 8 सामन्यात 308 धावा केल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीचं कसोटी संघात कमबॅक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेरीस पृथ्वीच्या पदरी निराशा पडली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

संबंधित बातम्या :

PHOTO | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘या’ नवख्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

भारतीय क्रिकेटपटूंना केवळ ‘कोविशिल्ड’ लस घ्यायचा सल्ला, पण कारण काय?

(Team India announces squad for ICC World Test Championship 2021 final and test series against England)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.