पृथ्वी शॉ, टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर असलेला मुंबईकर सलामीवीर फलंदाज. पृथ्वी शॉ याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली. पृथ्वीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक ठोकत आपली छाप सोडली. त्याला वनडे आणि टी 20i टीममध्ये संधी मिळाली. मात्र पृथ्वी गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियापासून दूर आहे. पृथ्वी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपेक्षा आरोग्य, बेशिस्तपणा, सरावाचा अभाव आणि वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत राहिलाय. पृथ्वीचं टीम इंडियातील कमबॅक इतक्यात तरी शक्य वाटत नाही. अशात पृथ्वीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका लागला आहे.
पृथ्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. मुंबईने रविवारी 15 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जेतेपादावर आपलं नाव कोरलं. पृथ्वी या विजयी संघाचा सदस्य होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता विजय हजारे ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने या स्पर्धेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. पृथ्वीला या 17 सदस्यीय संघातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी हा सर्वात मोठा झटका समजला जात आहे.
पृथ्वीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामातील सर्व 9 सामन्यांमध्ये संधी मिळाली. पृथ्वीने या 9 सामन्यांमध्ये एकूण 197 धावा केल्या. पृथ्वीला या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. पृथ्वीने विदर्भविरुद्धच्या उपांत्य पूर्व फेरीत 49 धावांची खेळी केली. पृथ्वी 9 पैकी 2 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्याला एका डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर 6 डावांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र मोठी खेळी करता आली नाही.
विरुद्ध गोवा : 33 धावा
विरुद्ध महाराष्ट्र : 0
विरुद्ध केरळ : 23 धावा
विरुद्ध नागालँड : 40 धावा
विरुद्ध सर्व्हिसेस : 0
विरुद्ध आंध्रा : 34
विरुद्ध विदर्भ : 49
विरुद्ध बडोदा : 8
विरुद्ध मध्य प्रदेश : 10
विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई टीम : श्रेयस लियर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटीयन, शार्दूल ठाकुर, रोयस्टन डायस, जुनेद खान , हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.