Team India | टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची सोशल मीडिया पोस्ट, क्रिकेट विश्वात खळबळ
टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनची इंस्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या क्रिकेटरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक मेसेज देणारा फोटो शेअर केला आहे. मात्र त्यामधून त्याला कुणावर निशाणा साधायचा आहे, हे अजूनही स्पष्ट नाही. हा खेळाडू टीम इंडियातून गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेर आहे.
टीम इंडियाचा मुंबईकर बॅट्समन पृथ्वी शॉ हा गेल्या काही दिवसांपूर्वी सेल्फी प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर तो आता पुन्हा चर्चेत आला आहे. पृथ्वीने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला. ज्यामुळे पृथ्वीची चाहतेही हैराण आहेत.
“काही लोकं तुमच्यावर तेवढेच प्रेम करतील जेवढे ते तुमचा वापर करू शकतात. फायदा संपला की त्यांची निष्ठा संपते”, अशी स्टोरी पृथ्वीने शेअर केली आहे. पृथ्वीच्या या पोस्टमधून नक्की रोख कोणाकडे आहे हे मात्र अजून समजू शकलेलं नाही.
पृथ्वी शॉ याची सोशल मीडिया पोस्ट
पृथ्वी गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वीची न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. याबद्दल अवघ्या काही दिवसांपूर्वी पृथ्वीने मौन सोडलं होतं.
तेव्हा पृथ्वी काय म्हणाला?
“मला टी 20 संघात पुन्हा स्थान मिळाल्याबद्दल आणि सराव करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटला. हा पण मला संधी मिळाली नाही. असं असलं तरी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली हे माझ्यासाठी खूप काही आहे. आता सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे की, संघात कधी खेळायचं कधी नाही. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.”, असं पृथ्वी शॉ याने सांगितलं.
“त्यांनी माझ्याऐवजी अशा व्यक्तीला संधी दिली जी व्यक्ती खरंच चांगली खेळत आहे. अशाच मला कोणत्याच पश्चाताप होत नाही. मी संधी शोधतच राहाणार आणि लक्ष्य गाठण्यासाठी मी सज्ज आहे. भारतीय संघासोबत मी ते लक्ष्य गाठेल.”, असं पृथ्वी शॉ याने पुढे सांगितलं.
“मी चांगल्या धावा करत आहे पण मला वाटतं इतकं पुरेसं नाही.मला अजून चांगल्या धावा करणं गरजेचं आहे. मग मी 379 धावा केल्या. तो माझा दिवस होता आणि ही संधी मी जाऊ दिली नाही. कधी वाईट वाटतं की, प्रयत्न करूनही संघात का नाही? पण कधीही तितका उशीर होत नाही.”, असं सांगत पृथ्वी शॉने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.