“सीरिज आधीच निवृत्ती”, विराटमुळे चाहत्यांमध्ये खळबळ, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Virat Kohli Social Media Post : बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली याने सोशल माीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विराटच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सीरिज आधीच निवृत्ती, विराटमुळे चाहत्यांमध्ये खळबळ, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
virat kohli team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 5:53 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांना पहिल्या सामन्याची प्रतिक्षा आहे. अशात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. विराटची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. विराटच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. इतकंच नाही, तर या पोस्टचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

विराटच्या पोस्टमुळे खळबळ

विराटने बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी ब्रँड प्रमोशन संदर्भात ही पोस्ट केली आहे, मात्र क्रिकेट चाहत्यांनी गैरसमज करुन घेतला. विराट कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय, असा अर्थ क्रिकेट चाहत्यांनी या पोस्टमधून काढला आहे. तर काही चाहत्यांनी तर कहरच केलाय. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघे विभक्त होत असल्याचा अर्थ या पोस्टमधून काढला. विराटने कसोटी कर्णधारपद सोडताना व्हाईट बॅकग्राउंडवर टेक्सट शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तर आताही चत्याच प्रकारे पोस्ट केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

विराटच्या पोस्टमध्ये काय?

“जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे ठरलो. आपण कधीच त्या गटात एकरुप झालो नाहीत, ज्यात आपल्याला एकरुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोघेही एकमेकांबाबत फक्त आकर्षित झाले. वेळेनुसार आपण बदललो. मात्र नेहमीच आपल्या पद्धतीने काम केलं. काहींनी आम्हाला वेडं समजलं. तर काहींना काही समजलंच नाही. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही याची पर्वा केली नाही”, असं विराटने या पोस्टमध्ये म्हटलं.

“दहा वर्षांमधील चढ-उतार आणि कोरोना महामारीतही आम्हाला डगमगलो नाहीत. आम्हाला जर कुणामुळे वेगळ पाडलं गेल्याचं जाणवलं तर ते ताकदीमुळे. इथे 10 वर्ष आपल्या पद्धतीने काम करण्यासाठी The Wrogn Way. तर पुढील 10 वर्षांपर्यंत योग्य पुरुषांसाठी Wrogn.”, असंही विराटने नमूद केलंय.

विराटच्या पोस्टवरील चाहत्यांचे कमेंट्स

विराटच्या पोस्टवरील चाहत्यांचे कमेंट्स

विराटच्या चाहत्यांनी घाई घाईत त्याची पोस्ट पूर्ण न वाचताच कमेंट करायला सुरुवात केली. “बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी संन्यास”, असं एका चाहत्याने कमेंट केली आहे. “छोटा हार्टअटॅक”, असं एकाने म्हटलंय. “अशा प्रकारे तर चाहते तुमच्या खऱ्याखुऱ्या निवृत्तीबाबतच्या पोस्टलाही प्रमोशनल पोस्ट समजतील, तुमच्या मॅनेजर/फॉन्ट, बॅकग्राउंड बदला”, असंही एका चाहत्याने नमूद केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.