IND vs ENG 4th Test | ‘ध्रुव’ चमकला, इंग्लंडवर 5 विकेट्सने मात, टीम इंडियाचा सामन्यासह मालिका विजय
India vs England 4Th Test Match Highlights In Marathi | टीम इंडियाने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. ध्रुव जुरेल याने निर्णायक भूमिका बजावली.
रांची | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने टीम इंडिया विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 61 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शुबमन गिल आणि आकाश दीप या जोडीने निर्णायक भागीदारी करत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. तसेच आर अश्विन, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल या चौघांनी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाची हा भारतातील 17 वा मालिका विजय ठरला.
इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 353 धावा केल्या. जो पुट याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडला 300 पार मजल मारता आली. रुट व्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. डेब्यूटंट आकाश दीप याने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज याला 2 आणि अश्विनच्या खात्यात 1 विकेट गेली.
ध्रुव जुरेल ठरला तारणहार
इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र ध्रुव जुरेल याने एकट्याने किल्ला लढवला. ध्रुवने 90 धावांची झुंजार खेळी केली. ध्रुवच्या या खेळीत 6 चौकार आणि 4 सिक्सचा समावेश होता. ध्रुवच्या या चिवट खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 300 पार पोहचता आलं. टीम इंडियाचा डाव 307 धावांवर आटोपल्या इंग्रजांना 46 धावांची आघाडी मिळाली.
आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला गुंडाळण्याचं आव्हान होतं. ही जबाबजारी आर अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांनी सार्थपणे पार पाडली. अश्विनने 5 विकेट्स घेतल्या. कुलदीपने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जडेजाच्या खात्यात 1 विकेट गेली. टीम इंडियाने इंग्लंडचं दुसऱ्या डावात 145 धावांवर पॅकअप केल्याने विजयासाठी 192 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 40 धावा करत आश्वासक सुरुवात केली.
चौथ्या दिवसाचा खेळ
चौथ्या दिवसाच्या खेळाला कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने सुरुवात केली. मात्र जो रुट याच्या बॉलिंगवर 41 वर्षांच्या जेम्स एंडरसने याने कॅच घेत इंग्लंडला पहिली विकेट मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीने 37 धावा केल्या. यशस्वीनंतर रोहितने काही वेळ किल्ला लढवला आणि अर्धशतक ठोकलं. मात्र रोहित त्यानंतर 55 धावा करुन माघारी परतला. रजत पाटीदार आला तसाच झिरोवर परतला. त्यामुळे इंग्लंडने कमबॅक केलं.
टीम इंडियचा ध्रुव चमकला
An unbeaten 72*-run partnership between @ShubmanGill & @dhruvjurel21 takes #TeamIndia over the line!
India win the Ranchi Test by 5 wickets 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ORJ5nF1fsF
— BCCI (@BCCI) February 26, 2024
त्यानंतर शोएब बशीर याने रवींद्र जडेजा आणि सरफराज खान दोघांना सलग 2 बॉलमध्ये आऊट केल्यानं टीम इंडिया आता अडचणीत सापडली. मात्र ध्रुव जुरेल पुन्हा मदतीला धावून आला. ध्रुव आणि शुबमन गिल या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. संयमी खेळी करत, 1-1 धाव जोडत टीम इंडियाला विजयी केलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. शुबमन गिल याने या दरम्यान सहावं कसोटी अर्धशतक ठोकलं. शुबमनने 52* आणि ध्रुवने नाबाद 39 धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जो रुट आणि टॉम हार्टली या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.