Team India | टीम इंडियाच्या या बॉलरचं 2 टेस्ट मॅचनंतरच करिअर संपलं!

टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Team India | टीम इंडियाच्या या बॉलरचं 2 टेस्ट मॅचनंतरच करिअर संपलं!
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 2:27 AM

मुंबई | टीम इंडियात काही वर्षांपूर्वी ठरलेली अशी टीम होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये निवड समितीपुढे अनेक पर्याय तयार झाले. ज्यामुळे टीम इंडियातील प्रस्थापित असलेल्या खेळाडूंवर संघातील स्थान गमवण्याची वेळ आली. तर या वाढत्या स्पर्धेमुळे टीम इंडियाला एकसेएक वरचढ असे खेळाडू मिळाले. या वाढत्या स्पर्धेमुळे आता टीम इंडियात अनुभवी आणि युवा अशा पद्धतीने 2 क्रिकेट संघ तयार करण्यात आलेत, यावरुनच टीम इंडियात स्थान मिळवणं किती आव्हानात्मक आहे, याची कल्पना येते.

आपल्या देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करावं, हे प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं. पण ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. टीममध्ये स्थान मिळवणं, मिळालेल्या संधीचं सोनं करणं, स्थान कायम ठेवणं हे या स्पर्धेच्या काळात प्रचंड आव्हानात्मक असतं. एकाही सामन्यात खेळाडूने निराशाजनक कामगिरी केल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो, कारण बेंचवर त्यापेक्षा सरस खेळाडू संधीच्या प्रतिक्षेत असतात. मात्र कधीकधी निवड समितीच्या दुर्लक्षामुळे खेळाडूंच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.

टीम इंडियाचा असाच एक वेगवान गोलंदाज आहे, ज्याची कसोटी कारकीर्द संपली की काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही तसंच आहे. या गोलंदाजाला निवड समितीने 2 कसोटी सामन्यांनंतर संधीच दिलेली नाही. आपण बोलतोय ते नवदीप सैनी याच्याबाबत

हे सुद्धा वाचा

निवड समितीच्या अवकृपा आणि दुखापतीचं ग्रहण यामुळे सैनी टीम इंडियातून बाहेर आहे. सैनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.

सैनीने वयाच्या 30 व्या वर्षी 2019 साली टी 20 पदार्पण केलं. सैनी आपला पहिला सामना विंडिंज विरुद्ध खेळला. त्यानंतर 2019 सालीच डिसेंबरमध्ये वनडे डेब्यू केलं. मात्र कसोटी पदार्पणासाठी त्याला 2 वर्षांची वाट पाहावी लागली. तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर तो दिवस उजाडलाच. नवदीपने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होम सीरिजमध्ये टेस्ट डेब्यू केलं.

मात्र सैनीची कारकीर्द बहरण्याआधीच ब्रेक लागला. सैनीला 2 कसोटी सामने खेळल्यानंतर टीम इंडियात संधीच मिळाली नाही.सैनी टीम इंडियाातून 2 वर्षांपासून बाहेर आहे. सैनी अखेरचा कसोटी सामना हा जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर सैनीला संधीच मिळालेली नाही.

नवदीपची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

नवदीपने आतापर्यंत 2 कसोटी, 8 वनडे आणि 11 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यात नवदीपने अनुक्रमे 4, 6 आणि 13 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.