दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेतील पराभवामुळे केएल राहुल नाराज, स्पष्टच म्हणाला…

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघाना हा विजय महत्त्वाचा आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेतील पराभवामुळे केएल राहुल नाराज, स्पष्टच म्हणाला...
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा पराभव जिव्हारी, केएल राहुलने सांगितलं की...
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 10:07 PM

मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना गुरुवारी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण दुसऱ्या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल नाराज झाला आहे. दुसऱ्या वनडे वनडे सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा 8 गडी राखून पराभव केला आहे. भारताचा एकही फलंदाज 50 षटकांपर्यंत तग धरू शकला नाही. संपूर्ण टीम इंडिया 46.2 षटकात 211 धावा करून तंबूत परतली. तर दक्षिण अफ्रिकेने विजयी लक्ष्य दोन गडी गमवून 42.3 षटकात पूर्ण केलं. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हारणं महागात पडलं. तर या सामन्यात टोनी डी जोरजीने शतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यातील पराभव कर्णधार केएल राहुल याच्या जिव्हारी लागला आहे. सामन्यानंतर त्याने याबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला केएल राहुल?

“सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे भारतीय फलंदाजांना या खेळपट्टीवर जम बसवणं कठीण गेलं. दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजीवेळी खेळपट्टीतील आर्द्रता कमी झाली आणि त्यांच्या फलंदाजांनी भारतीय स्विंग गोलंदाजांना संयमीपणे सामना केला.”, असं कर्णधार केएल राहुल म्हणाला.

“नाणेफेकीचा कौल हारणं महागात पडलं. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळाली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण आहे. पण आमचे काही फलंदाज चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करू शकल नाहीत. आम्ही आमच्या धावसंख्येत 50-60 धावा आणखी जोडू शकतो. वाटलं की 240-250 ही धावसंख्या चांगली ठरली असती. आम्ही आमच्या विकेट्स मोक्याच्या क्षणी गमावल्या.”, असं केएल राहुल याने पुढे सांगितलं.

“प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमिकेबद्दल माहिती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मी माझी भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. क्रिकेटमध्ये चूक की बरोबर असं काही नसतं. आपल्या संघाला सर्वश्रेष्ठ करू इच्छित आहे.”, असंही केएल राहुल याने पुढे सांगितलं. तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळते हा देखील चर्चेचा विषय आहे. रिंकू सिंह आणि संजू सॅमसन हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत. पण रिंकूचा हा पदार्पणाचा सामना होता. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळू शकते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.