रोहित शर्माला मिठी मारल्यावर नीता अंबानींना अश्रू अनावर, व्हिडीओ तुफान व्हायरल

Nita Ambani started crying while hugging Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि नीता अंबानी यांचा मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावेळी नीता अंबानी यांना अश्रू अनावर झाले होते.

रोहित शर्माला मिठी मारल्यावर नीता अंबानींना अश्रू अनावर, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 11:59 PM

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉन्सर्टला टीम इंडियाच्या खेळाडूंनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये रोहित शर्मा आणि नीता अंबानी एकमेकांना मिठी मारली. यावेळी नीता अंबानी भावनिक झाल्या होत्या, इतकंच नाहीतर त्यांना अश्रू अनावर झाले. नीता अंबानींनी टीम इंडियाच्या विजयाचा आनंदही या संगीत सोहळ्यामध्ये साजरा केला.

आज माझे मुंबई इंडियन्सचे कुटुंबच आले आहे. आजची रात्र उत्साहाची असून अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्यामध्ये टीम इंडियाच्या विजयाचा आनंदही साजरा करणार आहोत, असं नीता अंबानी म्हणाल्या.

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचं खास कनेक्शन आहे.  2013 साली रोहित शर्माकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वात टीमला पाच विजेतेपद जिंकून दिली आहेत. मात्र 2024 म्हणजेच यंदाच्या वर्षी रोहित शर्माची कर्णधारपदाची जबाबदारी काढली. हार्दिक पंड्याला कर्णधारपद करण्यात आलं होतं, मात्र हा निर्णय रोहितच्या चाहत्यांना आवडला नव्हता.

हार्दिक पंड्याला भर सामन्यात चाहते चिडवत होते. छपरी म्हणूनही त्यांना हिणवलं गेलं. मात्र त्याने हार मानली नाही. मुंबई इंडियन्सला काही यश मिळाली नाही, पण वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्याने चमकदार कामगिरी केली.

कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.