Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर संतापला, म्हणाला गिल-शुबमन…

Rohit Sharma IND vs BAN | टीम इंडियाला आशिया कप 2023 मध्ये स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश क्रिकेट टीमकडून अखेरच्या टप्प्यात पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पराभवानंतर काय म्हणाला?

Rohit Sharma बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर संतापला, म्हणाला गिल-शुबमन...
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 2:24 AM

कोलंबो | टीम इंडियाचा आशिया कप 2023 मध्ये पहिला पराभव झाला आहे. बांगलादेशने टीम इंडियावर सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. मात्र शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. मात्र टीम इंडिया विजय मिळवण्यात अपयशी ठरली आलं. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 266 धावांचा पाठलाग करताना 259 धावांवरच गुंडाळलं.

टीम इंडियाच्या पराभवामुळे शुबमन गिल याची 121 धावांची शतकी खेळी वाया गेली. तर अक्षर पटेल याने अखेरच्या टप्प्यात 42 धावांची दिलेली झुंज अपयशी ठरली. बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडलीय. त्यामुळे या विजय पराभवाचा तसा काही फरक या संपूर्ण स्पर्धेवर झालेला नाही. मात्र या विजयामुळे बांगलादेशचा वर्ल्ड कपआधी विश्वास चांगलाच वाढीस लागू शकतो. तर टीम इंडियावर पुन्हा एकदा आपल्यात काय कमी आहे, हे पाहण्याची वेळ आहे.

दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा याने बांगलादेशच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तसेच रोहित शर्मा याने शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांच्या खेळीचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

रोहित शर्मा काय म्हणाला?

“अक्षर पटेल याने शानदार बॅटिंग केली. मात्र सामना संपवू शकला नाही. याचं संपूर्ण श्रेय हे बांगलादेशच्या गोलंदाजांचं आहे. आम्ही हा सामना कसा खेळला, याबाबत निश्चितच तडजोड होणार नाही. अक्षरने आपली ताकद दाखवली. मात्र त्याला सामना आपल्या बाजूने झुकवता आला नाही. शुबमन गिल याची शतक दमदार होतं. शुबमनला कसं खेळायचं गे माहिती आहे. टीमसाठी काय करायला हवं, याबाबत शुबमनची भूमिका स्पष्ट आहे. शुबमनचे गेल्या वर्षांपासूनचे आकडे पाहा. शुबमन नव्या बॉलचा सामना पद्धतशीर करतोय. शुबमन कठोर परीश्रम करतो. शुबमनसाठी कोणताच पर्यायी सराव नाही. आम्ही आमच्या योजनेनुसार काही खेळाडूंना पर्याप्त वेळ देऊ इच्छितो”, असं रोहित सामन्यानंतर म्हणाला.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.