Team India | कॅप्टन रोहित शर्मा यालाही दुखापत, शुबमन गिल याच्यानंतर टीम इंडियाला झटका

Indian Cricket Team | टीम इंडियासाठी अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचआधी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला दुखापत झाली आहे.

Team India | कॅप्टन रोहित शर्मा यालाही दुखापत, शुबमन गिल याच्यानंतर टीम इंडियाला झटका
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 1:24 PM

नवी दिल्ली | टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल हा आजारपणामुळे ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तान विरुद्धही खेळणार नाहीये. त्यामुळे टीम इंडियाचं आधीच टेन्शन वाढलेलं आहे. त्यात आता अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. शुबमन गिल याच्यानंतर आता टीम इंडियाचा स्टार बॅट्समनला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला दुखापत झाली आहे. रोहितला मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी सरावादरम्यान दुखापत झाली. मात्र रोहितच्या दुखापतीबाबत अजूनही बीसीसीआयकडून अधिकृत माहित देण्यात आलेली नाही.रोहितला सराव करताना पायाला बॉल लागला. रोहित बॉल लागल्याने त्याला त्रास झाला. रोहित मात्र यानंतरही सराव करत राहिला. आता रोहित जर या दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरुद्ध खेळू शकला नाही, तर टीम इंडियासाठी तो मोठा झटका असेल.

दरम्यान शुबमन गिल पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्ताननंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही जवळपास मुकणार आहे. शुबमनला डेंग्यु झाल्याने रविवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुबमनच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र शुबमनला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. आता शुबमनला पूर्णपणे फीट होण्यासाठी किती वेळ लागतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.