IND vs BAN : टीम इंडियाला डिवचणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना रोहित शर्माचे उत्तर, म्हणाला…

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये रोहितने सविस्तरपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत. यामधील रोहित शर्माचे एक वक्तव्य व्हायरल होत आहे.

IND vs BAN : टीम इंडियाला डिवचणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना रोहित शर्माचे उत्तर, म्हणाला...
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 5:31 PM

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला दोन दिवसांनी म्हणजेच 19 सप्टेंबरपासून सुरूवातल होणार आहे. पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर होणार असून टीम इंडिया पोहोचली आहे. या मालिकेआधी कॅप्टन रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेमध्ये मोठ वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर ज्याची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.

रोहित शर्मा काय म्हणाला?

बांगलादेशचे खेळाडू करत असलेल्या वक्तव्यांबद्दल रोहितला विचारण्यात आलं. यावर बोलताना, सगळ्या संघांना भारतामध्ये हरवताना खूप मजा येते. बांगलादेशच्या खेळाडूंना मजा करूदेत. ज्यावेळी इंग्लंडचा संघ आला होता तेव्हा त्यांनीही पत्रकार परिषदेमध्ये खूप काही म्हटलं होतं. मात्र आम्ही त्याकडे काही लक्ष देत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला. यंदाच्या वर्षी सुरूवातीलाच इंग्लंडचा संघ भारतात आला होता त्यावेळी भारताने 4-1 ने पराभव केला होता.

माझ्या डोक्यात नेहमी हेच सुरू असतं की मी सामना कसा जिंकू शकतो. क्रिकेटपटूंना त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी ठराविक वेळ असतो. आमच्यातील प्रत्येकजण जो खेळतो त्याची जिंकण्याची इच्छा असते. कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या अंतराने टीम इंडिया खेळत आहे. मात्र त्याचा जास्त काही परिणाम होणार नाही. त्यामुळे चेन्नईमध्ये छोट्या कॅम्पचे आयोजन करण्यात आलं. जे खेळाडू खूप दिवस खेळले नाहीत आणि काही दुलीप ट्रॉफी खेळून आलेत, असंही रोहित शर्माने सांगितलं.

रोहित शर्माने पत्रकार परिषदेत नवीन कोचिंग स्टाफबद्दलही वक्तव्य केलं आहे. नवीन स्टाफ आला आहे. पण मी गौतम गंभीर आणि अभिषेक नायर (सहायक प्रशिक्षक) यांना आधीच ओळखतो, मी मॉर्न मॉर्केल (गोलंदाजी प्रशिक्षक) विरुद्ध खेळलो आहे. मी 17 वर्षांपासून खेळत आहे त्यामुळे मला माहित आहे की प्रत्येक कोचिंग स्टाफचा दृष्टिकोन वेगळा असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

बांगलादेशविरूद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.