हैदराबाद | टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. गुरुवार 25 जानेवारीपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सामन्याच्या एकदिवसआधी 24 जानेवारी रोजी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. या दरम्यान टीम इंडियाचे 2 प्रमुख आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी टीम इंडियाला आतापर्यंत अनेक सामने एकहाती जिंकून दिले. रहाणेने टीम इंडियाला आपल्या कॅप्टन्सीत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून दिली. मात्र आता या दोघांचाच टीममधून पत्ता कट करण्यात आला आहे. या दोघांना दक्षिण आफ्रिकेनंतर आता इंग्लंड विरुद्धही कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही. आता या दोघांबाबत कॅप्टन रोहितने बोलता बोलता हिंट दिलीय. दोघांचं करिअर संपल्यात जमा आहे, असं अप्रत्यक्ष संकेत रोहितने दिले.
टीम मॅनेजमेंटचा कळ हा युवा खेळाडूंना प्राधान्याने देण्याकडे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. विराटने इंग्लंड विरुद्ध पहिल्या 2 सामन्यातून माघार घेतली. त्या जागी बीसीसीआयने रजत पाटीदार याला संधी दिली. विराटने माघार घेतल्याने त्याजागी रहाणे किंवा पुजाराला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र विराटच्या जागी रजत पाटीदार टीममध्ये आला.
“टीममध्ये अनुभवी खेळाडूंच्या कमबॅकबाबत आम्ही विचार केला. पण मग युवा खेळाडूंना संधी केव्हा मिळणार. आम्ही याबाबतही विचार केला. मात्र अनुभवी खेळाडूंना टीममधून बाहेर ठेवणं सोपं नव्हतं.”, असं रोहितने स्पष्ट केलं.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.