Video : रोहित शर्मा निवृत्ती मागे घेणार? हिटमॅनने पत्रकाराला मराठीतच दिलं उत्तर, पाहा काय म्हणाला…

Rohit Sharma Marathi : टीम इंडियाला आपल्या नेतृत्त्वात टी-२० वर्ल्ड जिंकून देणाऱ्या रोहितने मराठीमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. मरिन ड्राईव्हच्या विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्मा माध्यमांशी बोलताना मराठीमध्ये बोलला.

Video : रोहित शर्मा निवृत्ती मागे घेणार? हिटमॅनने पत्रकाराला मराठीतच दिलं उत्तर, पाहा काय म्हणाला...
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 11:49 PM

T-20 वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राईव्हला चाहत्यांचा महासागर उपस्थित राहिला होता. अवघ्या जगाने पाहिले असेल की भारतात लोक क्रिकेटवर किती प्रेम करतात. यंदाचा वर्ल्ड कप जिंकला आणि त्यासोबतच तीन दिग्गज खेळाडूंनी टी-20 क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा तिन्ही अशा हुकमी खेळाडूंचा समावेश आहे. अनेक चाहत्यांची इच्छा आहे की रोहितने आणखीन क्रिकेट खेळावं, निवृत्तीचा मागे निर्णय घ्यायला हवा. आजच्या विजयी रॅलीनंतर रोहितला याबाबत परत एकदा मराठी पत्रकाराने विचारलं त्यावर रोहित त्याला मराठीत उत्तर देत पाहा काय म्हणाला.

सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. कारण 11 वर्षांनी भारताकडे ट्रॉफी परत आली असं रोहित शर्मा म्हणाला. त्यानंतर त्याला पत्रकाराने निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहते नाराज झालेत, आणखी खेळावंस अशी त्यांची इच्छा आहे. यावर बोलताना, नाय…नाय… एकदम बरोबर वेळी निवृत्ती घेतली आहे. माझ्यासाठी २००७ आणि २०२४ दोन्हीसुद्धा स्पेशल आहेत, असं रोहितने शर्माने सांगितलं. रोहित शर्मा विजयी रॅलीमध्ये ढोलाच्या तालावर अगदी मोकळ्या मनाने नाचला होता. यावरून त्याला विचारल्यावर आपण वर्ल्ड कप जिंकलाय त्यामुळे नाचलंच पाहिजे असं म्हणत हिटमॅन निघून गेला.

पाहा व्हिडीओ:

टीम इंडिया आज गुरूवारी सकाळी मायदेशात परतला. सकाळी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांच्यासोबत सर्व खेळाडूंसह स्टाफने गप्पा मारल्या. त्यानंतर प्रत्येक खेळाडूने मोदींसोबत फोटो काढले. त्यानंतर  टीम मुंबईकडे रवाना झाली.

मुंबईमध्ये आल्यावर बसने नरिहम पॉईंटवरून वानखेडे डबल डेकमध्ये जंगी मिरवणुक काढली. भारतीय चाहत्यांनी शेजारील समुद्रासमोर मानवी महासागर उभा केला होता इतक्या संख्येने ते उपस्थित राहिले होते. टीम मधील खेळाडू नाचले चाहत्यांनाही नाराज केलं नाही. आजचा दिवसाची क्रिकेटच्या इतिहासात कायम नोंद ठेवली जाईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.