Rahul Dravid : आशिया कप स्पर्धेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड याला राग अनावर, तसा प्रश्न विचारताच भडकला

Asia Cup 2023 Team India : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुखापतीतून सावरत काही खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे टीम इंडियाची ताकद वाढली आहे. असं असताना राहुल द्रविड पत्रकारांच्या एका प्रश्नामुळे चांगलाच वैतागला.

Rahul Dravid : आशिया कप स्पर्धेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड याला राग अनावर, तसा प्रश्न विचारताच भडकला
Rahul Dravid : कायम शांत असलेल्या राहुल द्रविड याला त्या प्रश्नामुळे भडकला, स्पष्टच म्हणाला की...
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 5:30 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची आशिया कप 2023 स्पर्धेत अग्निपरीक्षा होणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीवर टीम इंडियाची वनडे वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता अधोरेखित होणार आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंकडून मोठी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. दुसरीकडे, गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियातील प्रयोगांमुळे प्रश्नही उपस्थित केले जात आहे. खासकरून चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील खेळाडूबाबत विचारलं जात आहे. श्रेयस अय्यर फीट होऊन संघात परतला खरा पण त्याचा फॉर्म आणि इतर सर्वच बाबींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. असं असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. खासकरून चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या खेळाडूंबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा राहुल द्रविड याने स्पष्टच सांगितलं की, “या क्रमांकावर खेळण्यासाठी टीम इंडियाकडे खेळाडू होते. पण सर्व एकत्रच जखमी झाले.”

वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियावर प्रयोग

वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 जिंकली. पण सामन्यातील प्रयोग सर्वांच्या लक्षात राहणारे आहेत. याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड याला प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याने गरज असल्याने असे प्रयोग केल्याचं सांगितलं. “नंबर 4 आणि नंबर 5 वर कोण फलंदाजी करणार हे 18 महिन्यांपूर्वी स्पष्ट होतं. यासाठी भारताकडे ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर होते. पण ते सर्व दुखापतग्रस्त झाले आणि गणित बिघडलं.”, असं राहुल द्रविड याने सांगितलं.

“खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली. एक्सपेरिमेंट हा शब्द खूपच उचलला जात आहे. नंबर चार आणि पाचबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे या क्रमांकावर कोण खेळणार हे माहित नाही. पण 18 महिन्यांपूर्णी आमच्या डोक्यात असा काही संभ्रम नव्हता.”, असं राहुल द्रविड याने स्पष्टपणे सांगितलं.

श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे लक्ष

टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. तत्पूर्वी झालेल्या सराव सामन्यात श्रेयस अय्यर याने चमकदार कामगिरी केली. सराव सामन्यात 200 धावा केल्याचंही समोर आलं होतं. तसेच 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. श्रेयस अय्यर फिट अँड फाईन असल्याचं यावरून अधोरेखित झालं आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.