IND vs PAK | पाकिस्तानला चिरडल्यानंतर टीम इंडियाला गूड न्युज, आयसीसीची मोठी घोषणा
India vs Pakistan Icc World Cup 2023 | भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने मात करत वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाला या विजयानंतर मोठी बातमी मिळाली आहे.
अहमदाबाद | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग तिसरा विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली. टीम इंडियाने हा सामना एकतर्फी केला. टीम इंडियाचा पाकिस्तानवर वर्ल्ड कपमधील आठवा विजय ठरला. पाकिस्तान यावेळेसही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावर विजय मिळवण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाला या विजयानंतर आणखी एक गूड न्युज मिळाली आहे. आयसीसीने टीम इंडियाला ही गोड बातमी दिली आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन रोहित शर्मा याने बाबर सेनेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हिटमॅन रोहितचा बॉलिंग करण्याचा निर्णय एकदम अचूक ठरवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानवा अवघ्या 191 धावांवर गुंडाळलं. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आता टीम इंडियाला विजयासाठी फक्त 192 धावा हव्या होत्या.
आयसीसीकडून आनंदाची बातमी
टीम इंडियाने या विजयासह आयसीसी वनडे रँकिंगमधील अव्वल स्थान कायम राखलंय. आयसीसीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये 118 रेटिंग्स पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर पाकिस्तान 115 रेटिंग्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका 110 पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड पाचव्या स्थानी आहे.
टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 86 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने नाबाद 53 धावा केल्या. तर विराट कोहली आणि शुबमन गिल या दोघांनी प्रत्येकी 16 धावा जोडल्या. तर केएल राहुल याने नॉट आऊट 19 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे फक्त 3 विकेट्स गमावून सहज विजय मिळवला.
आयसीसीचं ट्विट
And still your No.1 ranked ODI team 🇮🇳
Latest changes in the @MRFworldwide ICC Men’s ODI Rankings ⬇️#CWC23 https://t.co/YDndILqqi3
— ICC (@ICC) October 15, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.