Prithvi Shaw : निवड समितीकडून सातत्याने दुर्लक्ष, पृथ्वीची ‘ती’ स्टोरी व्हायरल
बीसीसीआयने पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) श्रीलंका विरुद्धच्या (IND vs SL) टी 20 आणि एकदिवसीय या मालिकांमध्ये संधी दिली नाही.
मुंबई : बीसीसीआयने (Bcci) मंगळवारी 27 डिसेंबरला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी (Sri Lanka Tour Of India 2023) भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली. बीसीसीआयने दोन्ही मालिकांसाठी युवा खेळाडूंना संधी दिली. मुंबईकर सूर्यकुमार यादवचं प्रमोशन केलं. मात्र दुसऱ्या मुंबईकर खेळाडूवर सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप हा क्रिकेट चाहत्यांकडून केला जातोय. श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) निवड केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र आताही निवड समितीने कानाडोळा केला. यानंतर पृथ्वीची इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. (team india cricketer prithvi shaw insta story viral after bcci selection committee not selected to his against sri lanka t 20 and odi series)
पृथ्वीने इंस्टा स्टोरीमध्ये एक शायरी पोस्ट केलीय. पृथ्वीच्या या स्टोरीचं अनेक अर्थ काढले जात आहेत.”किसीने मुफ्त मे पा लिया वह शख्स, जो मुझे हर किंमत पर चाहिये था”, अशी शायरी पृथ्वीने शेअर केलीय. याचा अर्थ असाही काढला जातोय की इतर युवा खेळाडूंना श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी सहजासहजी संधी मिळाली. मात्र मी इथे संधीची वाट पाहतोय पण मला मिळत नाहीये. या शायरीतून पृथ्वीचा रोख संघात निवड झालेल्या युवा खेळाडूंवरही असल्याचं म्हटलं जात आहे.
पृथ्वीची इंस्टा स्टोरी
Look at the prithvi shaw insta story#INDvSL pic.twitter.com/Xq6NGvgJcG
— memes_hallabol (@memes_hallabol) December 28, 2022
पृथ्वी टीम इंडियामधून गेल्या अनेक महिन्यांपासून लांब आहे. पृथ्वी अखेरची ओडीआय मॅच 23 जुलै 2021 ला श्रीलंका विरुद्ध खेळला होता. तर 25 जुलै 2021 ला त्याने टी 20 डेब्यू केलं होतं. पृथ्वीने टी 20 डेब्यूनंतर एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
टीम इंडियात आपलं पुन्हा कमबॅक व्हावं, यासाठी पृथ्वी सातत्याने प्रयत्न करतोय. पृथ्वीने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पृथ्वीने आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) दिल्लीकडून खेळताना 10 सामन्यांमध्ये 152.97 च्या स्ट्राइक रेटने 283 धावा केल्या. मात्र त्यानंतरही पृथ्वीसाठी भारतीय संघाचे परतीचे मार्ग उघडत नाहीयेत.