Shardul Thakur Wedding | शार्दुल ठाकूर अखेर ‘त्या’ तरुणीशी विवाहबद्ध

टीम इंडियाचा स्टार बॉलर 'लॉर्ड' शार्दुल ठाकूर विवाहबद्ध झाला आहे. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Shardul Thakur Wedding | शार्दुल ठाकूर अखेर 'त्या' तरुणीशी विवाहबद्ध
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 8:29 PM

मुंबई | टीम इंडियात गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा माहोल सुरु आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन केएल राहुल याने अभिनेत्री अथिया शेट्टीसह लगीनगाठ बांधली. तर फिरकीपटू अक्षर पटेल यानेही गर्लफ्रेंडसह लग्न केलं. आता टीम इंडियाचा ‘लॉर्ड’ या नावाने ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर विवाहबद्ध झाला आहे. शार्दुलने त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुळकरसोबत लग्न केलं आहे. शार्दुलच्या लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या दोघांचा विवाहसोहळा हा मुंबईजवळच्या पालघरमध्ये पार पडला. त्याआधी शुक्रवारी 24 मार्चला शार्दुलचा हळदी समारंभ पार पडला. शार्दुलचा या हळदी समारंभातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. शार्दुलने झिंगाट डान्सवर बुंगाट डान्स केला होता. त्यानंतर रविवारी 26 फेब्रुवारीला संगीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शार्दुलने मितालीसह रोमॅन्टिक डान्सही केला.

हे सुद्धा वाचा

शार्दुल-मिताली यांचा साखरपुडा हा 29 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला होता. त्यानंतर टी 20 वर्ल्ड 2022 कपआधी हे दोघे गोव्यात लग्न करणार होते. मात्र काही कारणांमुळे गोव्यात लग्न होणं शक्य झालं नाही. तसेच लग्नही पुढं ढकलावं लागलं होतं. मात्र अखेर 15 महिन्यांच्या अंतरानंतर विवाह पार पडला.

शार्दुल ठाकूर-मिताली पारुळकर विवाहबद्ध

कोण आहे मिताली पारुळकर?

मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल आणि मिताली हे दोघेही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होते. अखेर या अनेक वर्षांच्या पार्टनरशीपनंतर दोघेही लाईफ पार्टनर झाले आहेत.

शार्दुलच्या बायकोच्या कंपनीच नाव काय?

फेब्रुवारी 2020 मध्ये मिताली पारुळकर स्वत:ची बेकरी कंपनी सुरु केली. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ तिच्या कंपनीचे नाव आहे. ती बिझनेसवुमन असून फेब्रुवारी 2020 पासून व्यवसाय संभाळतेय. या कंपनीची स्वत:ची वेबसाइट आहे. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ कंपनीकडून वेगवेगळे केक, कुकी, ब्रेड, बनस बनवले जातात. हा ब्रांड यशस्वी ठरला आहे.

दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. या कसोटी मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या वनडे सीरिजसाठी शार्दुल याची निवड करण्यात आली आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.