Yashasvi Jaiswal | यशस्वी जैस्वाल मोठा चाहता, NCA मधून वेळ मिळताच ‘या’ ठिकाणी पोहोचला

| Updated on: Jun 28, 2023 | 10:23 AM

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालला तिथे पाहून सगळ्यांनाच आश्चर्यचा धक्का बसला. यशस्वीची वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी निवड झाली आहे. चेतेश्वर पुजाराला टीममधून डच्चू दिलाय. यशस्वी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.

Yashasvi Jaiswal | यशस्वी जैस्वाल मोठा चाहता, NCA मधून वेळ मिळताच या ठिकाणी पोहोचला
Yashasvi Jaiswal
Image Credit source: twitter
Follow us on

बंगळुरु : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या टेस्ट टीममध्ये यशस्वी जैस्वालची निवड झाली आहे. सध्या तो बंगळुरुमध्ये आहे. NCA मध्ये तो स्वत:ला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तयार करतोय. NCA मध्ये ट्रेनिंग करणाऱ्या यशस्वी जैस्वालला 27 जूनच्या संध्यााकळी थोडा वेळ मिळाला. त्यावेळी यशस्वी दुसरा एक सामना पाहण्यासाठी पोहोचला. यशस्वीला तिथे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

यशस्वी जैस्वाल क्रिकेट बरोबर फुटबॉलचाही चाहता आहे. मंगळवारी संध्याकाळी तो फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी पोहोचला. सुनील छेत्री भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे. छेत्री विराट कोहलीचा चांगला मित्र आहे. यशस्वी जैस्वाला त्याचाच खेळ पाहण्यासाठी आणि भारतीय फुटबॉल टीमला सपोर्ट करण्यासाठी तिथे पोहोचला होता.

निकाल काय लागला?

भारत आणि कुवेतमध्ये काल फुटबॉल सामना झाला. दोन्ही टीम्समधील हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. भारताला या सामन्यात आत्मघातकी गोलची किंमत चुकवावी लागली. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला नाही. 2 च्या जागी भारताला फक्त 1 च पॉइंट मिळाला.

कोणामध्ये होता सामना?

यशस्वी जैस्वालने भारत-कुवेत सामन्याचा आनंद लुटला. या मॅचमध्ये मसाला सुद्धा भरपूर होता. या सामन्यात गोल पाहायला मिळालेच. पण खेळाडूंचा राग आणि भांडण सुद्धा पाहिली.


सुनील छेत्रीचा हा कितवा गोल?

भारताकडून या सामन्यात एकमेव गोल सुनील छेत्रीने केला. SAFF चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुनील छेत्रीचा हा 5 वा गोल आहे. याआधी पाकिस्तान विरुद्ध 3 आणि नेपाळ विरुद्ध 1 गोल केलाय. टुर्नामेंटमध्ये भारताचा हा तिसरा सामना होता.


सर्वात आधी क्रिकेट

भारत-कुवेत सामना पाहायला स्टेडियममध्ये आलेल्या यशस्वी जैस्वालने क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं नाही. NCA त त्याने नेट्समध्ये अनेक तास सराव केला. सोशल मीडियावर ते फोटो पोस्ट केलेत.

सिद्ध करण्याच चॅलेंज

वेस्ट इंडिज दौऱ्यावर यशस्वी जैस्वालला चेतेश्वर पुजाराच्या जागी निवडलय. म्हणजे या सामन्यात तो नंबर 3 वर फलंदाजी करताना दिसेल. भारतीय टीम मॅनेजमेंटने मोठी संधी दिलीय. यशस्वीला स्वत:ला सिद्ध करुन दाखवाव लागेल.