VIDEO | धनश्री हीचा युजवेंद्रसमोर अनोळखी व्यक्तीसह बिकिनी डान्स, व्हीडिओ व्हायरल
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कॉरियोग्राफर धनश्री वर्मा 22 डिसेंबर 2020 रोजी विवाबहबद्ध झाले होते. युजवेंद्र आणि धनश्री दोघेही सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात.
Dhanshree Verma Bikini Dance | टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा भाग नाही. युजवेंद्र सध्या पत्नी धनश्री वर्मा हीच्यासोबत वेळ घालवतोय. धनश्री सोशल मीडियावर कायम आपल्या डान्समुळे चर्चेत असते. धनश्रीने इंस्टाग्रामवर बिकिनी डान्सचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. धनश्रीसोबत चहलसुद्धा आहे. चहल धनश्रीसोबत शर्टलेस डान्स करताना दिसतोय.
धनश्री या व्हीडिओत युजवेंद्रशिवाय आणखी एका अनोळखी व्यक्तीसह डान्स करताना दिसतेय. धनश्रीच्या या डान्सचं काही जण कौतुक करतायेत. तर काहींना धनश्रीचा हा डान्स अजिबात आवडलेला नाही. नेटकऱ्यांनी या व्हीडओवरुन धनश्रीला चांगलंच सुनावलंय. अशाप्रकारचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करु नको, असा सल्ला नेटकऱ्यांनी धनश्रीला दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी धनश्रीच्या व्हीडिओवर पातळी सोडूनही टीका केली आहे.
धनश्री नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
धनश्रीला या व्हीडिओवरुन नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलंय. arnika_mote या अकाउंटवरुन धनश्रीला “उर्फी जावेद बनू नकोस”, असा सल्ला दिला आहे.
तर shritejasvi_1208 लिहिलंय की “तुम्ही कधी दुसऱ्या क्रिकेटपटूच्या पत्नीला स्वत:च्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुणा व्यक्तिसह एन्जॉय करताना पाहिलंय का? तु एकमेव अशी आहे जी नवऱ्याला सोडून प्रत्येक क्रिकेटरसोबत असतेस”.
धनश्री वर्माचा डान्स
धनश्री सोशल मीडियावर डान्सचे व्हीडिओ शेअर करत असते. धनश्रीने याआधी टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर यासह डान्स केला होता. यावरुनही नेटकऱ्यांनी चहलला सावध राहण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान मध्यंतरी युजवेंद्र-धनश्री यांच्या दोघांमध्ये खटके उडाल्याचंही म्हटलं जात होतं. प्रकरण इतकं टोकाला गेलं होतं की विषय घटस्फोटापर्यंत पोहचला होता. मात्र धनश्री आणि युजवेंद्रने आमच्यात सर्व काही मस्त चाललंय म्हणून घटस्फोटाच्या वृत्ताचं खंडन केलं होतं.
कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवला . त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकले.
दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणाार आहे. या वनडे सीरिजासाठी चहलची निवड करण्यात आली आहे. या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.