WI vs IND 1st Test | वेस्ट इंडिज मालिका संपताच ‘हा’ खेळाडू घेणार कसोटीमधून निवृत्ती? क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा!
वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात कमबॅक नाही केलं तर ही कसोटी तीन दिवसांमध्ये संपू शकते. मात्र ही कसोटी मालिका संपताच संघातील बडा खेळाडू निवृत्ती घेणार असल्याचं समजत आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिला कसोट सामना डॉमिनिका येथे सुरू आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यावर टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात कमबॅक नाही केलं तर ही कसोटी तीन दिवसांमध्ये संपू शकते. मात्र ही कसोटी मालिका संपताच संघातील बडा खेळाडू निवृत्ती घेणार असल्याचं समजत आहे.
कोण आहे तो खेळाडू?
पहिल्या कसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांवर आटोपला होता. आर. अश्विनने या कसोटीमध्ये 5 विकेट घेत महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर भारताकडून पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधाीर रोहित शर्मा यांनी दमदार सुरूवात करून दिली आहे. हा सामना भारत जिंकणार असं दिसतं आहे. एकंदरित भारताचा बॅटींग लाईन अप पाहता कॅरेबियन संघाला जड जाणार त्यामुळे वेस्ट इंडिजचे गोलंदाज भारताला किती धावांच्या आत रोखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्मा निवृत्ती घेणार असल्याचं बोललं जात आहे. इशांतने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. अद्याप त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इशांत आता या मालिकेत पण कॉमेट्री करताना दिसला.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 311, एकदिवसीय सामन्यात 115 आणि T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.