Mohammed Shami: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची मोठी घोषणा, नक्की काय सांगितलं?
Mohammed Shami Team India: मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेपासून दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर आहे. त्यानंतर आता शमीने मोठी घोषणा केली आहे.
टीम इंडियाचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी हा गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अखेरचा खेळला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास 9 महिने शमी दूर आहे. शमीला दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं. फेब्रुवारी 2024 मध्ये शमीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. शमी सध्या टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी बंगळुरुतील एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करतोय. शमीची टीम इंडिया बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकूतन एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात मोहम्मद शमी याने प्रतिक्रिया दिली आहे.
मोहम्मद शमी सध्या बंगालमध्ये आहे. शमीला नुकतंच कोलकाता येथे पूर्व पंगाल कल्बकडून सन्मानित करण्यात आलं. शमीने या दरम्यान टीम इंडियातील कमबॅकबाबत प्रतिक्रिया दिली. “मी कधीपर्यंत कमबॅक करेन हे आता सांगणं अवघड आहे. मी कमबॅकसाठी खूप मेहनत करतोय. मात्र मला टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत पाहण्याआधी तुम्ही मला बंगालच्या जर्सीत पाहाल. मी 2-3 सामने पूर्ण तयारीने खेळण्यासाठी येणार आहे”, असं शमीने या कार्यक्रमात म्हटलं. अशात मोहम्मद शमी आगामी देशांतर्गत हंगामात बंगालकडून खेळताना दिसू शकतो.
शमीने दुखापतीबाबत काय म्हटलं?
शमीने या सत्कार समारंभात दुखापरतीबाबत प्रतिक्रिया दिली. “कधी विचार केला नव्हता की दुखापत इतकी गंभीर असेल. टी 20 वर्ल्ड कपनंतर दुखापतीकडे गांभीर्याने पाहणार होतो. मात्र दुखापतीने वनडे वर्ल्ड कप दरम्यान दुखापतीने डोकं वर काढलं. त्यामुळे मी जोखीम घेतली नाही. इतकंच काय, तर डॉक्टरांनीही विचार केला नव्हता की दुखापत इतकी वाढेल आणि त्यातून बरं होण्यासाठी इतरा वेळ लागेल”, असं शमीने सांगितलं. मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. शमीने अवघ्या 7 सामन्यांमध्ये तब्बल 24 विकेट्स घेत टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली होती.
मोहम्मद शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दरम्यान मोहम्मद शमीने टीम इंडियाचं 64 कसोटी, 101 एकदिवसीय आमि 23 टी20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. शमीने कसोटीत 229, वनडेत 195 आणि टी20iमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत. शमीने 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 अर्धशतकांसह 970 धावाही केल्या आहेत.