Captain : ‘रोहित आयुष्यात सगळं विसरेल पण ही एक गोष्ट कधीच विसरणार नाही ; टीम इंडियाच्या माजी बॅटींग कोचचे मोठे विधान

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच लाखो फॅन आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच विजेतेपद आता टी-20 वर्ल्ड कप जिंकत रोहितने इतिहास रचला. हिटमॅनची विसरण्याची एक सवय आहे, ती अनेकांना माहित आहे. याचाच धागा पकडत टीम इंडियाच्या माजी कोचने मोठं विधान केलं आहे.

Captain : 'रोहित आयुष्यात सगळं विसरेल पण ही एक गोष्ट कधीच विसरणार नाही ; टीम इंडियाच्या माजी बॅटींग कोचचे मोठे विधान
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 8:03 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा किती विसरभोळा आहे सर्वांना माहितच आहे. टॉसला जिंकल्यावर तो आपला निर्णय देताना गडबडून जातो. अनेकदा तो हॉटेलमध्ये त्यात्या मौल्यवान वस्तू विसरल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. रोहित बोलतानाही त्याच्या स्टाईलमध्ये बोलतो. काही गोष्टी सांगताना तो ज्याचं संदर्भ देतो तेव्हा फक्त, ‘ते नाही का, आपलं हे’ असं बोलतो. विराटनेही रोहितच्या या सवयीबाबत सांगितलं होतं. मात्र रोहित शर्मा याची एक अशी गोष्ट आहे जो ती कधीच विसरत नाही, असं टीमच्या माजी कोचने सांगितलं आहे.

मी आतापर्यंत कोणत्याही कॅप्टनला टीम मीटिंग आणि स्ट्रॅटेजीच्या चर्चांमध्ये रस घेताना पाहिलं नाही. मान्य आहे रोहित टॉसवेळी गोलंदाजी की फलंदाजी निर्णय घ्यायचा हे विसरेल, बसमध्ये रोहित त्याचा फोन आयपॅड विसरतो. पण, तो कधीच गेम प्लॅन विसरू शकत नाही. चालू सामन्यामध्ये परिस्थिनुसार तो चतुराईने रणनिती आखत असल्याचं टीम इंजिडयाचे माजी बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी सांगितलं. तरूवर कोहलीच्या पॉकास्टमध्ये राठोड बोलत होते.

सामन्याआधी गेम प्लॅन करण्यासाठी जास्त वेळ लावतो. टीममधील बॉलर आणि बॅट्समनच्याही मीटिंगला हजर राहतो. सर्वांसोबत बसून काय केलं पाहिजे यासाठी सर्वांसोबत चर्चा करतो. प्रत्येक खेळाडूसोबत त्याची चांगली मैत्री असते. तो टीममधील खेळाडूंसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. रोहितकडे तीन गुण आहेत, पहिला एक चांगला खेळाडू, तो त्याच्या खेळाला चांगलं समजतो आणि त्याकडे नेहमी गेमप्लॅन तयार असतो, असं विक्रम राठोड म्हणाले.

तुम्हाला खेळाडूंचा एक नेता म्हणून नेतृत्व करावं लागतं. पण त्यासाठी तुम्हाला तशी दर्जेदार कामगिरी करता यायला हवी. रोहित जेव्हापासून कॅप्टन झालाय तेव्हापासून त्याने नेहमीच आपल्या खेळीने सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे. रोहित हा सर्व खेळाडूंशी जोडला गेल्याचं राठोय यांनी सांगितलं.

विक्रम राठोड हे टीम इंडियाचा बॅटींग कोच होते. टी -20 वर्ल्ड कप 2024 साली टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर राहुल द्रविड याच्यासह विक्रम राठोड यांचाही कोचपदाचा कार्यकाल संपला.  रोहितच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने 13 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.