MS Dhoni | महेंद्रसिंह धोनी याच्या निर्णयामुळे सर्वच हैराण, 2 वर्षांनी कमबॅक
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. धोनीने तब्बल 2 वर्षांनी कमबॅक केलं आहे.
मुंबई : महेंद्रसिंह धोनी, टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि विकेटकीपर. धोनीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला टी 20, वनडे आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिलं. त्यानंतरच्या काही वर्षांनी धोनीने 15 ऑगस्ट 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. धोनी आता फक्त आयपीएलमध्येच खेळतो. धोनी सोशल मीडियावर फार सक्रीय नसतो. मात धोनीने 2 वर्षानंतरं असं काही केलं आहे, ज्यामुळे धोनीने चाहतेही हैराण झाले आहेत. धोनीने सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
धोनीचं 2 वर्षानंतर कमबॅक
धोनीने तब्बल 2 वर्षानंतर इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. धोनीने तब्बल 2 वर्षांनी इंस्टाग्राम पोस्ट केल्याने चाहते हैराण आहेत. धोनीने एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत धोनी फार्म हाऊसमध्ये ट्रॅक्टर चालवतोय. “काही नवीन शिकून चांगलं वाटलं.”, असं कॅप्शन धोनीने या व्हीडिओला दिलं आहे. धोनीने या आधी अखेरची इंस्टाग्राम पोस्ट ही 8 जानेवारी 2021 रोजी केली होती.
धोनीची इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
आयपीएलमध्ये खेळताना दिसणार
धोनी आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात एकूण 4 वेळा चॅम्पियन केलं आहे. धोनी यंदाही चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. धोनीने आयपीएल 2022 आधी कॅप्टन्सी सोडली होती. त्यानंतर रवींद्र जडेजाला सूत्रं दिली होती. मात्र पुन्हा एकदा धोनीने नतृत्वाची जबाबदारी स्वीकारली.
धोनीने 2004 मध्ये 23 डिसेंबरला बांगलादेश विरुद्ध वनडे डेब्यू केलं होतं. यानंतर धोनीकडे सप्टेंबर 2007 मध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर धोनीने जे काही केलं ते उभ्या भारताने नाही, तर जगाने पाहिलं. धोनीने पहिल्याच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विजयी केली. तर त्यानंतर 2011 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 28 वर्षांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. तर 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचं जिंकून दिली.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. सीरिजमधील पहिला सामना हा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या सीरिजमधील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.