Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL | बांगलादेशविरूद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमन गिल याला युवराज सिंहने झापलं, म्हणाला…

Yuvraj Singh on Shubman Gill : भारताचा ओपनर युवा खेळाडू शुभमन गिल याने झुंजार शतक केलं, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू युवराज सिंग यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

IND vs SL | बांगलादेशविरूद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमन गिल याला युवराज सिंहने झापलं, म्हणाला...
युवराज सिंह याने गिलच्या पोस्टवर कमेंट करत, तू आजचा सामना सहज जिंकून देऊ शकत होता. मात्र चुकीच्या शॉटमुळे तू आऊट झाला असं युवराज म्हणाला.
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 12:09 AM

मुंबई : आशिया कपमधील भारत आणि बांगलादेश मध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताचा 6 धावांनी पराभव झाला. भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि सर्व डाव फिस्कटला. सुपर 4फेरीमध्ये भारताचा शेवट विजयने झाला नाही तर दुसरीकडे बांगलादेश संघाने आपला शेवटचा सामन्यात विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचा ओपनर युवा खेळाडू शुभमन गिल याने झुंजार शतक केलं, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू युवराज सिंग यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाला युवराज सिंह?

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एकटा शुभमन गिल शेवटपर्यंत मैदानावर टिकला होता. बांगलादेशच्या गोलंदाजांना गडी एकटा पुरून उरलेला. सर्व मुख्य खेळाडूंमध्ये एकालाही मोठी खेळी करता आली नाही. शुभमनने शतकी खेळी केली तरीसुद्धा युवराज सिंगने त्याच्यावर नेमका निशाणा का साधला? तर युवराज सिंगने त्याच्या या खेळीचं कौतुक केलंच पण त्याची चूक त्याला दाखवून दिली.

सामना संपल्यानंतर गिलने आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केला. त्यासोबतच कॅप्शनमध्ये, आजच्यासाठी पुरेसं नाही पण फायनल साठी सर्व काही आता तयार आहे, असं म्हटलं होतं. गिलच्या याच पोस्टवर युवराज सिंह यांने कमेंट करत त्याला त्याची एक चूक दाखवून दिली. तू आजचा सामना एकहाती जिंकू शकत होता, मात्र खराब शॉटमुळे तू आउट झाल्याचं, युवराज सिंहने म्हटलं आहे.

आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका उद्या म्हणजेच रविवारी 17 सप्टेंबरला कोलंबोमधील प्रेमदास स्टेडियम मध्ये  एकमेकांसोबत भिडणार आहेत. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असणार आहे.

दरम्यान, सुपर 4 फेरी मधील भारत-श्रीलंका सामन्यामध्ये श्रीलंकेचा संघ जड गेला होता. त्यावेळी श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेललागाने याने टीम इंडियाच्या भारताच्या प्रमुख पाच फलंदाजांना आऊट करत बॅकफुटवर ढकल होतं. हा सामना कुलदीप यादव आणि जसप्रीत  बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर जिंकला  होता. उद्याच्या  सामन्यात रोहित अँड कंपनी काय प्लॅनने उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.