मुंबई : आशिया कपमधील भारत आणि बांगलादेश मध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताचा 6 धावांनी पराभव झाला. भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि सर्व डाव फिस्कटला. सुपर 4फेरीमध्ये भारताचा शेवट विजयने झाला नाही तर दुसरीकडे बांगलादेश संघाने आपला शेवटचा सामन्यात विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचा ओपनर युवा खेळाडू शुभमन गिल याने झुंजार शतक केलं, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू युवराज सिंग यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात एकटा शुभमन गिल शेवटपर्यंत मैदानावर टिकला होता. बांगलादेशच्या गोलंदाजांना गडी एकटा पुरून उरलेला. सर्व मुख्य खेळाडूंमध्ये एकालाही मोठी खेळी करता आली नाही. शुभमनने शतकी खेळी केली तरीसुद्धा युवराज सिंगने त्याच्यावर नेमका निशाणा का साधला? तर युवराज सिंगने त्याच्या या खेळीचं कौतुक केलंच पण त्याची चूक त्याला दाखवून दिली.
सामना संपल्यानंतर गिलने आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केला. त्यासोबतच कॅप्शनमध्ये, आजच्यासाठी पुरेसं नाही पण फायनल साठी सर्व काही आता तयार आहे, असं म्हटलं होतं. गिलच्या याच पोस्टवर युवराज सिंह यांने कमेंट करत त्याला त्याची एक चूक दाखवून दिली. तू आजचा सामना एकहाती जिंकू शकत होता, मात्र खराब शॉटमुळे तू आउट झाल्याचं, युवराज सिंहने म्हटलं आहे.
आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका उद्या म्हणजेच रविवारी 17 सप्टेंबरला कोलंबोमधील प्रेमदास स्टेडियम मध्ये एकमेकांसोबत भिडणार आहेत. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असणार आहे.
दरम्यान, सुपर 4 फेरी मधील भारत-श्रीलंका सामन्यामध्ये श्रीलंकेचा संघ जड गेला होता. त्यावेळी श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेललागाने याने टीम इंडियाच्या भारताच्या प्रमुख पाच फलंदाजांना आऊट करत बॅकफुटवर ढकल होतं. हा सामना कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता. उद्याच्या सामन्यात रोहित अँड कंपनी काय प्लॅनने उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.