Yuvraj & Dhoni | धोनी माझा जवळचा मित्र नव्हता, युवराज सिंहचा ‘ही’ दोन उदाहरणं देत मोठा खुलासा!

Yuvraj Singh And MS Dhoni Relationship : वर्ल्ड कपदरम्यान स्टार खेळाडू युवराज सिंह याने माजी कर्णधार महेंद्र सिंहबाबत मोठा खुलासा केलाय. धोनी आणि त्याच्यामध्ये क्लोल फ्रेंडशिप नसल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यासोबतच आणखी काही मोठे खुलासे केले आहेत.

Yuvraj & Dhoni | धोनी माझा जवळचा मित्र नव्हता, युवराज सिंहचा 'ही' दोन उदाहरणं देत मोठा खुलासा!
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 5:20 PM

मुंबई : भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह याने एका टॉक शोमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र धोनीसोबत आपली जवळचा मित्र नसल्याचं युवीने म्हटलं आहे. भारताने जिंकलेले टी-20 आणि वन डे वर्ल्ड कप या दोन्हींमध्ये युवराज आणि धोनीने महत्त्वाची भूमिक बजावली होती. युवराज असं का म्हणाला? यावेळी त्याने दोन उदाहरणंही दिलीत. त्यासोबतच करिअरच्या शेवटला धोनीने त्याला काय सांगितलं याबाबतही युवराजने खुलासा केलाय.

नेमकं काय म्हणाला युवराज सिंह?

मी आणि माही जवळचे मित्र नाहीत, आम्ही एकत्र खेळत होतो त्यामुळे आमची मैत्री होती. पण आमच्यात कधी घट्ट मैत्री झाली नाही. प्रत्येकाची जीवन जगण्याची वेगळी पद्धत असते. संघातील 11 खेळाडू कधी एकत्र राहत नाहीत. मी आणि माही मैदानात उतरायचो त्यावेळी आम्ही 100 टक्के द्यायचो. धोनी कर्णधार आणि मी उपकर्णधार असताना त्याचे अनेक निर्यण मला पटायचे नाहीत, तर माझेही काही निर्णय त्याला समजण्यापलीकडे असायचे, प्रत्येक संघात असं असतंच, असं युवराज सिंहने सांगितलं.

दोघांना एकमेकांना केलेली मदत- युवराज

अनेकदा धोनी मैदानात असताना जखमी किंवा दुखापती झाला की मी त्याचा रनर बनून मैदानात उतरायचो. मला आठवतंय की धोनी 90 धावांवर असताना त्याला 100 पर्यंत पोहोचण्यासाठी मी त्याला स्ट्राईक दिलेली. त्यावेळी मला दोन धावा पूर्ण करताना डाय मारावी लागली होती. धोनीनेही 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलंँडविरूद्ध 48 धावांवर असताना अर्धशतक पूर्ण करताना मदत केल्याचं युवराजने सांगितलं.

करीअरच्या शेवटला धोनीकडून सल्ला

माझ्या करीअरच्या शेवटाला आलो होतो तेव्हा भविष्याबद्दल काही माहित नव्हतं. तेव्हा मी धोनीला एक सल्ला मागितला होता, त्यावेळी मला धोनीने सांगितलं होतं की निवड समिती माझ्याबद्दल विचार करत नाही. त्यामुळे मला काय चालू आहे हे लक्षात आलं होतं. ही 2019 वर्ल्ड कपच्याआधीची गोष्ट असल्याचं युवराज म्हणाला.

दरम्यान, आता आम्ही दोघेही रिटायर झालो असून जेव्हा भेटतो तेव्हा चांगले मित्र म्हणून भेटतो. आताच एका जाहिरातीच्या शूटमध्ये एकत्र भेटलो होतो त्यावेळी खूप मजा केली आणि गप्पा मारल्याचं युवराजे सांगितलं.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.