Kapil Dev Video | टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचं अपहरण?

Kapil Dev Viral Video | टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओतून दिसणारे दृश्य पाहून देव यांचं अपहरण केल्याचा दावा हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

Kapil Dev Video | टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचं अपहरण?
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 6:45 PM

मुंबई | एक खळबळजनक आणि क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार दिग्गज कपिल देव यांचं अपहरण झाल्याची भीती सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. कपिल देव यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत कपिल देव यांचं अपहरण केलं जात आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही हाच व्हीडिओ शेअर केला आहे. “हा व्हीडिओ आणखी कुणाकडे आला आहे का? कपिल देव सुखरुप आणि सुरक्षित असतील अशीच आशा आहे”,अंसं म्हणत गंभीरने कपिल देव यांचा व्हीडिओ काळजीपोटी शेअर केला आहे.

व्हायरल व्हीडिओत काय?

या व्हायरल व्हीडिओत कपिल देव यांचं तोंड आणि हात बांधलेले आहेत. त्यांना दोघे जण कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहेत. त्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडं दिसून येत आहेत. काहींनी शंका व्यक्त करत म्हटलंय की हे कपिल देव नाहीच. तर काही जण म्हणतायेत की खरंच कपिल देव याचं अपहरण झालंय का?

या व्हायरल व्हीडिओमुळे अनेक जण संभ्रमात आहेत. काही नेटकरी विचारत आहेत की हा व्हीडिओ खोटा आहे. तर काही जण म्हणातेयत की हा व्हीडिओ जाणीवपूर्व तयार करण्यात आला आहे. या व्हीडिओबाबत अनेक दावे केले जात आहेत.

व्हायरल व्हीडिओ

व्हीडिओची सत्यता काय?

कपिल देव यांचा व्हायरल झालेला व्हीडिओ हा खरा नसल्याचा दावा केला जात आहे. कपिल देव यांचा व्हीडिओ हा एका जाहीरातीचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. हल्ली सरार्सपणे अनेक कंपन्यांकडून चित्तवेधक आणि लक्षवेधक जाहीराती केल्या जातात. सर्वसामांन्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. तोच प्रकार कपिल देव यांच्या व्हीडिओबाबतही असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान याआधी अशाच प्रकारे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांचं अपहरण केल्याचं नाटक केलं होतं. त्यानंतर भोगले यांनी जाहीर माफीही मागितली होती. त्यामुळे कपिल देव यांचाही व्हीडिओ प्रँक किंवा जाहीरातीचा भाग असून ते सुखरुप असतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.