ICC Rankings: टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी, ऑस्ट्रेलियाला धोका
ICC Test Rankings: टीम इंडिया सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फक्त काही गुणांच्या अंतराने दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे.

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता रिलॅक्स मोडवर आहे. टीम इंडियाचा आता महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी एकही आंतरराष्ट्रीय सामना नियोजित नाही. मात्र सप्टेंबरनंतर टीम इंडियाच्या सलग अनेक मालिका आहेत.टीम इंडिया सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. मात्र टीम इंडियाकडे क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी टीम इंडियाला पुढील सामने जिंकावे लागणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला नंबर
आयसीसीच्या टेस्ट क्रिकेट रँकिंमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. कसोटीचा अपवाद वगळला तर उर्वरित दोन्ही प्रकारात टीम इंडिया नंबर आहे. भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20i क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यात कसोटी क्रमवारीत फक्त 4 रेटिंग्स पॉइंट्सचा फरक आहे. ऑस्ट्रेलिया आयसीसी कसोटी क्रमवारीत ताज्या आकडेवारीनुसार 124 रँकिंगसह नंबर 1 आहे. तर टीम इंडिया 120 रेटिंग्सह दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडिया यंदा नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात 5 सामने खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध 5 सामने खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच नंबर 1 होण्याची सुवर्णसंधी आहे.
टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. तर मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना हा 27 सप्टेंबरपासून होणार आहे. बांगलादेश टेस्ट सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. तर त्यानंतर न्यूझीलंड टीम इंडिया दौरा करणार आहे. तेव्हा इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 टेस्ट मॅचेस होणार आहेत. इंडिया-न्यूझीलंड कसोटी मालिकेची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होईल. तर 5 नोव्हेंबरला सांगता होईल. टीम इंडिया त्यांनतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होईल. तोवर ऑस्ट्रेलियाचा एकही कसोटी सामना नियोजित नाही. त्यामुळे टीम इंडियाकडे कसोटीत नंबर 1 होण्याची संधी आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलिय दौऱ्याआधी5 पैकी काही कसोटी सामने जिंकून नंबर 1 होऊ शकते. इतकंच नाही, सर्व सामने जिंकले तर टीम इंडियाला आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम होईल. त्यामुळे टीम इंडियाच्या मायदेशातील कसोटी मालिकेकडे साऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.