Rahul Dravid : टी 20 क्रिकेटमधून रोहित-विराटची करिअर संपलं? द्रविडची हिंट

रोहित आणि विराटचं (Rohit Virat) टी 20 करियर संपलंय, अशी हिंट द्रविडने (Rahul Dravid) दिली.

Rahul Dravid : टी 20 क्रिकेटमधून रोहित-विराटची करिअर संपलं? द्रविडची हिंट
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 6:20 PM

मुंबई : टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी टी 20 पासून दूर आहेत. त्यात आता हेड कोच राहुल द्रविडने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यानंतर विराट-रोहितबाबत मोठी हिंट दिली आहे. रोहित आणि विराटचं टी 20 करियर संपलंय, अशी हिंट द्रविडने दिली. हार्दिक पंड्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. (team india head coach rahul dravid give hint about rohit sharma and virat kohli t20i career)

राहुल द्रविड काय म्हणाला?

“टी 20 वर्ल्ड 2022 सेमीफायनलनंतर असे 3-4 खेळाडूच आहेत, जे श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत खेळत आहेत. पुढील टी 20 हंगामाबाबत आमचा विचार वेगळा आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी श्रीलंका विरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव राहिला. सध्या आमचं लक्ष्य हे आगामी वनडे वर्ल्ड कर आणि टेस्ट चॅम्पियनशीपवर आहे. त्यामुळे आमच्याकडे आता युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांना पारखण्याची वेळ आहे”, असं द्रविडने स्पष्ट केलं.

इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह खेळले होते. तेच आता श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतही खेळत आहेत. हे चारही खेळाडू श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळले.

हे सुद्धा वाचा

पांड्याच्या निर्णयाचं समर्थन

दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी फाग पाडलं. द्रविडने पांड्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं. “आम्ही काही विकेट्स लवकर गमावल्या. विकेट्स गमावल्या नसत्या तर परिस्थिती वेगळी असती. तिथे फार दवं होतं, ज्यामुळे श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांना त्यांच्या कोट्यातील सर्व ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. पिचकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय योग्य होता. आम्ही आणखी चांगली कामगिरी केली असती तर निकाल आणखी आला असता”, असंही द्रविडने स्पष्ट केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.